milind gawali  esakal
Premier

Aai Kuthe Kay Karte: "दुपारच्या वेळेचा टीआरपी..."; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या वेळेबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट

priyanka kulkarni

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेची वेळ आता बदलण्यात आली आहे. आई कुठे काय करते ही मालिका आता दुपारी अडीच वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची वेळ बदलल्यानंतर कोणता फरक पडला? तसेच लोक दुपारी ही मालिका बघतात का? याबद्दल आता मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “आई कुठे काय करते” (Aai Kuthe Kay Karte) आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता. जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनल लागलेला असायचं, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो असंख्य कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडे “आई कुठे काय करते” ही मालिका आवर्जून बघितली जाते, त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही , आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता “आई कुठे काय करते“ ही मालिका बघितली जायची,आता 18 मार्चपासूनचा निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसातच्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल."

"संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का असा एक मनामध्ये प्रश्न येत होता, पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की “आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का“ ! मला ऐकून छान वाटलं आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे. मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये, संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टार वर असो बघणारे हे आवडीने बघतातच ,मला खरंच स्टार प्रवाहचं ,राजनशाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, creative team चं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं, उत्तम काम करायचीconsistency, creative thinking, persistency.", असंही मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पुढे मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत? पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते. आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट, ही इतक्या लवकर कशी संपू शकेल , जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये interesting, unpredictable, आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारा घडत असतं, आजही मला करताना तेवढीच मजा येते आहे . बरं ईथे बाहेर अतिशय ऊन वाढलेला आहे, 37-38 डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर, तुम्ही पण सगळे काळजी घ्या भरपूर पाणी पीत जा, शक्यतो उन्हात जाऊ नका, अडीच वाजता स्टार प्रवाह वर “आई कुठे काय करते” बघा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई हादरली! झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, भीषण आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश

मुन्ना यादव कुटुंबात राडा, एकमेकांवर हल्ला; धंतोली ठाण्यात दोन्ही गटांत गोंधळ, परिसरात तणाव

Solar Storm: गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा स्वादिष्ट अन् कुरकुरीत 'Banana Kofta' नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT