Aamir Khan shares his debut story 
Premier

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असणारा कलाकार आमिर खान काही ना काही कारणामुळे कायमच चर्चेत असतो. उत्तम अभिनेता म्हणून ओळख कमावलेल्या आमिरने आजवर वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांमध्ये काम केलंय आणि बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याने ओळख बनवलीय. नुकतंच त्याने एका शोमध्ये त्याला त्याच्या पहिल्या सिनेमाची ऑफर कशी मिळाली याची खास आठवण सांगितली.

नुकतंच आमिरने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कपिलने त्याला त्याने गुजराती नाटकात काम केलेलं त्या आठ्वणीविषयी विचारलं. तेव्हा आमिरने त्याच्या गुजराती नाटकाचा आणि त्याला पहिली फिल्म कशी मिळाली याचा किस्सा शेअर केला.

तो म्हणाला,"मी खूप योगायोगाने अभिनेता झालो. मी कॉलेजला गेलो तेव्हा मी नाटकांमध्ये काम करण्यासाठी उत्सुक होतो. तेव्हा महेंद्र जोशी नावाचे दिग्दर्शक होते. मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं पण मी ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालो नाही. पण मी कधीच हार मानत नाही. त्यावेळी मला मराठीही यायचं नाही आणि गुजरातीही यायचं नाही पण तरीही मी गुजराती नाटकाचं ऑडिशन दिलं आणि त्यातील कोरस गाणाऱ्या गटासाठी माझी निवड झाली."

हा किस्सा सांगताना तो पुढे म्हणाला,"आमच्या नाटकाच्या रिहर्सल सुरु होत्या. मला त्यात एक डायलॉगही होता. नाटकाची तारीख जवळ येत होती आणि ज्या दिवशी नाटकाचा पहिला प्रयोग होता त्याच्या दोन दिवस आधी महाराष्ट बंद झाला. त्यामुळे मला माझ्या आईने रिहर्सलला पाठवलं नाही. मी दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा माझ्या नाटकाचे दिग्दर्शक बसले होते. त्यांनी मला आदल्या दिवशी न येण्याचं कारण विचारलं. मी त्यांना कारण सांगितलं पण त्यांनी काहीही न ऐकून घेता मला नाटकातून काढून टाकलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडतच स्टेजसमोर असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसलो. तेव्हाच माझा एक मित्र तिथे आला. त्याने माझी ओळख इंद्रजित सिंह बन्सल यांच्याशी करून दिली. त्यांनी मला त्यांच्या एका एफटीआय आय साठी बनणाऱ्या सिनेमात काम ऑफर केलं. मी लगेच स्वीकारलं. त्या सिनेमामुळे मला लगेच राजीव सिंहची फिल्म मिळाली. हे दोन्ही सिनेमे पाहून केतन मेहताने मला माझी पहिली व्यावसायिक फिल्म होली ऑफर केली."

आमिरचं या सिनेमातील काम पाहून मन्सूर खान आणि नासिर हुसेन यांनी त्याला कयामत से कयामत तक हा सिनेमा ऑफर केला. त्याचं या सिनेमासाठी ऑडिशन झालं आणि त्याचा अभिनय सगळ्यांना आवडला आणि या सिनेमात त्याने जुही चावलासोबत काम केलं आणि हा सिनेमा सुपरहिट झाला.

'महाराष्ट्र बंद'च्या त्या दिवसाने आमिरचं नशीब पालटलं. आज आमिर भारतातील सगळ्यात आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे आणि आता तो लवकरच 'सितारे जमीन पर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT