Abhinay Berde : मराठी इंडस्ट्रीमधील एक दिग्गज अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. विनोदी ते गंभीर सगळ्याच भूमिका लक्ष्मीकांत यांनी उत्तमपणे साकारल्या. २००४ साली लक्ष्मीकांत यांचं निधन झालं पण आजही त्यांचं स्थान प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. नुकतंच त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांविषयीच्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या.
अभिनयचं सध्या रंगभूमीवर 'आज्जीबाई जोरात' हे एआय वर आधारित नाटक सुरु आहे. या नाटकाच्या प्रोमोशननिमित्त त्याने आरपार चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनय त्याचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी व्यक्त झाला. त्यांचं नातं आता कसं असतं यावर भाष्य त्याने केलं.
अभिनय म्हणाला,"आता बाबा असते तर मी कसं त्यांच्याशी वागलो असतो हे मला अजिबात माहित नाही. कदाचित बाबा असते तर मी व्यक्तीच वेगळा असतो.आता जर ते अचानक आले तर मला कसं वाटेल ते मी सांगू शकतो. त्यांनी माझं नाटक बघितलं तर मला खूप आवडेल. माझ्या नाटकाची अनाऊन्समेंट त्यांच्या आवाजात आहे. ए आय मधून आम्ही ती बनवली आहे. ते असते तर त्यांच्याबरोबर शांतेचं कार्ट हे नाटक करायची माझी खूप इच्छा होती."
त्यानंतर लक्ष्मीकांत आणि स्वतःच्या स्वभावातील साधर्म्याबाबत अभिनय म्हणाला कि,"आमच्या दोघांचा स्वभाव काही बाबतीत सारखा आहे. काही बाबतीत माझा स्वभाव आईसारखा आहे. मी बाबांसारखा हजरजबाबी आहे. त्यांचा कॉमेडी टायमिंग माझ्यात आहे असं मला आमच्या दिग्दर्शकाने सांगितलं आहे. तर आईसारखा मी जिद्दी आहे आणि तिच्यासारखा राग मला येतो."
आज्जीबाई जोरात हे एक सुपरहिरो फिक्शनवर आधारित नाटक असून यात निर्मिती सावंत, जयवंत वाडकर आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकार काम करत आहेत. तर अभिनय एका तरुण मुलाची भूमिका साकारतोय. हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.