Atul Parchure  ESakal
Premier

Atul Parchure Passed Away: मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी तारा निखळला! अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन

Vrushal Karmarkar

Atul Parchure News: अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीला धक्का बसला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांना कर्करोग झाला होता. ज्यातून ते बरे झाले होते. मात्र आता त्यांची तब्येत खालावली होती. अतुल परचुरे यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. मराठीसह त्यांनी बॉलीवूडमध्येही आपली स्थान निर्माण केले होते.

मराठी दिग्गज अभिनेते अतुल परचुरे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. मात्र, गेल्या वर्षी त्याने कॅन्सरवर मात केली आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती. मात्र आज त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी झी मराठी वाहिनीवरील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी या घरची, जागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

अनेक नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. अतुल परचुरे यांनी कापूसकोंडयाची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे आर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, वृक्ष आणि वल्ली, टिळक, आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात तसेच बॉलीवूडमध्येही अतुल परचुरे यांचा नावलौकिक होता. ते शाहरुख खानचा 'बिल्लू', सलमान खानचा 'पार्टनर' आणि अजय देवगणचा 'ऑल द बेस्ट' या चित्रपटांमध्ये दिसले होते. तसेच कपिल शर्मा शो मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT