Govinda Bullet Injury  
Premier

Govinda Bullet Injury : गोविंदाला नेमकी गोळी कशी लागली? रुग्णालयात कोण घेऊन गेलं? अपडेट आली समोर

रोहित कणसे

दिग्गज बॉलिवुड अभिनेता गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी आपली बंदूक साफ करत असताना बंदूक जमीनीवर पडली आणि गोळी फायर झाली. ही गोळी गोविंदा यांच्या पायाला लागली. यावेळी त्यांची पत्नी सुनिता या त्यांच्यासोबत नव्हत्या. पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदा यांनी ताबोडतोब आपल्या भावाला फोन केला होता.

गोविंदा यांचे मोठे बंधू कीर्ति कुमार यांनी एबीपी न्यूजला सांगितेल की, जेव्हा गोविंदाला पायावर सकाळी अपघाताने गोळी लागली तेव्हा गोविंदाने मला सवतः कॉल केला होता. गोविंदाने त्याच्यासोबत नेमकं काय झालं याबद्दल सर्व काही सांगितले. मी घाईघाईने गोविंदाच्या घरी पोहचलो आणि तीन-चार जण मिळून गोविंदला तात्काळ क्रिटी केयर रुग्णलयात घेऊन गेलो. ऑपरेशननंतर गोविंदाची तब्येत आता ठीक आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितेल की, सध्या काही कुटुंबिय रुग्णालयात आहेत आणि डॉक्टर त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत. काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही. सुदैवाने घटना इतकी गंभीर नव्हती आणि त्यांना जास्त काही झाले नाही, मला टीव्हीवर काहीही बोलण्याची इच्छा नाही, मला फक्त इतकेच सांगायचे आहे... मी यापेक्षा अधिक काही सांगू शकणार नाही.

ही घटना घडली तेव्हा गोविंदा यांच्या पत्नी सुनिता या मुंबईत नव्हत्या. त्यांना या अपघाताबद्दल माहिती मिळताच त्या मुंबईकडे रवाना झाल्या.

गोविंदा यांची मुलगी टीनाने हेल्थ अपडेट देताना सांगितले की तिचे वडील हे आयसीयूमध्ये आहेत. सध्या गोविंदा ठीक आहेत आणि २४ तास आयसीयूमध्ये राहतील. यानंतर गोविंदा यांनी स्वतः त्यांच्या आरोग्याबद्दल अपडेट दिली. त्यांनी ऑडिओच्या माध्यमातून सांगितेल की, "तुम्हा सगळ्यांचे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंच्या कृपेमुळे.... गोळी लागली होती, पण ती आता काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad: BCCI चा ऋतुराजसाठी मोठा प्लॅन; ...म्हणून T20I मालिकेत टीम इंडियात दिले नाही स्थान; कारण ऐकून खूश व्हाल

Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांविरोधातील वक्तव्य राहुल गांधी यांना भोवल नाशिक न्यायालयाने बजावला समन्स

Manwat Murders : "ते हत्याकांड आमच्या गावाजवळच घडले"; मकरंद अनासपुरे यांनी सांगितली ती आठवण , "उत्तमरावची भूमिका..."

BJP Government: ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन, पण मोदी-'' मंत्री चिराग पासवान यांचा इशारा

Latest Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT