Premier

Mother's Day 2024 : आणि ते गाणं ऐकताच कार्तिक भावूक झाला ; आईचा आजार आणि स्ट्रगल

सकाळ डिजिटल टीम

आज मदर्स डे. आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आई कायमच तिच्या मुलांसाठी खूप कष्ट करते. त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करते. आपल्या आईविषयी अनेक कलाकारांनी मुलाखतींमध्ये त्यांचं प्रेम व्यक्त केलंय. त्यांनी त्यांच्यासाठी केलेले कष्ट शेअर केले आहेत.

बॉलिवूडमध्ये आपल्या बळावर स्वतःचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. मदर्स डे निमित्त कार्तिकचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कार्तिक त्याच्या आईसाठी या व्हिडिओमध्ये भावूक झाला होता.

काही वर्षांपूर्वी कार्तिकने 'पती, पत्नी और वो' सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने इंडियन आयडॉल या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी एका स्पर्धकाने गायलेल्या गाण्याने कार्तिक भावूक झाला. त्याने त्या स्पर्धकाचं कौतुक केलं आणि "हे गाणं माझ्यासाठी खूप पर्सनल आहे" असं तो त्यावेळी म्हणाला. याच स्पष्टीकरण देताना तो म्हणाला कि,"ही गोष्ट या आधी मी कधी कुणाला सांगितली नव्हती. तीन वर्षांपूर्वी माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तो काळ आमच्यासाठी खूप वाईट होता. त्यावेळी माझं करिअरही नीट सुरु झालं नव्हतं. पण तुम्हाला तिच्याकडे बघून कधी वाटणार नाही कि तिने कधी अशा आजाराचा सामना केलाय. ती आजारी असतानाही ती माझी काळजी घेत होती. तिने इतका स्ट्रगल केलाय. तिने कायमच खूप कष्ट केले आहेत. मी तिची जेवढी काळजी घेतली नाही तेवढी तिने माझी काळजी घेतलीये. ती कायमच एक फायटर आहे. " हे सांगताना कार्तिकला अश्रू अनावर झाले होते. तर त्याच्या सहकलाकार भूमी आणि अनन्यासुद्धा त्यावेळी भावूक झाल्या. भूमीच्या डोळ्यातही पाणी आलं.

कार्तिकने ही घटना चार वर्षांपूर्वी सांगितली होती. त्याने सांगितलेल्या ही घटना खूप चर्चेत होती. कार्तिकची आई डॉक्टर असून त्यांचं ग्वालियरमध्ये क्लिनिक आहे. त्याचे वडीलही डॉक्टर आहेत तर त्याची बहिणही डॉक्टर होण्याचं शिक्षण घेतेय. त्याच्या आई-वडिलांनी खूप कष्ट करत त्या दोघांनाही वाढवलं असल्याचं कार्तिकने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT