Rajanikant dance  Esakal
Premier

Viral Video Of Anant Ambani Wedding :अहो आश्चर्यम् ! जगाला नाचवणाऱ्या थलैवाला अंबानींच्या लग्नात धरावा लागला रजनी स्टाईल ठेका

सकाळ डिजिटल टीम

Anant Ambani & Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा थाटात पार पडतोय. सगळीकडेच या विवाहसोहळ्याची चर्चा सुरु असून अनेक दिग्गज मंडळी या विवाहसोहळ्यात सहभागी झाली आहेत. बॉलिवूडपासून ते अगदी टॉलिवूडपर्यंतच्या दिग्गज कलाकारांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावलीच इतकंच नाही तर अनंतच्या वरातीत भन्नाट डान्सही केला.

सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते सगळ्यांच्या लाडक्या रजनी अण्णांनी. अनंत अंबानीच्या वरातीत सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ठेका धरला. रणवीर सिंह आणि अनिल कपूर यांच्याबरोबर 'गल्लन गुडिया' या गाण्यावर रजनी सर बेफाम नाचले. विरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या बरोबर अनंत अंबानी, शिखर पहारिया, बोनी कपूर यांनीही या गाण्यावर ठेका धरला. या गाण्यावर नाचताना बोनी कपूर यांना होणार आनंदही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तर अनंतच्या हटके स्टेपची चर्चाही सोशल मीडियावर रंगलीय.

रणवीरने गाजवली वरात

अनंत अंबानीची वरात गाजवली ते रणवीर सिंहने. बॉलिवूडचा पॉवरहाऊस अशी ओळख असलेल्या रणवीरच्या वरातीमधील एनर्जेटिक डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रणवीरने सगळ्या सेलिब्रिटीजना एकत्र करत बेफाम डान्स केला. तर डीजे वाल्याजवळ उभं राहून त्याने केलेल्या डान्सने अनेकांनी लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी दीपिकालाही या वेळी मिस केलं. रणवीरचा अनिल कपूर यांच्या एनर्जेटिक डान्स मुव्ह्जनी सोशल मीडियाही गाजवलंय. तर अनन्या पांडे, ख़ुशी कपूर, ऑरी यांनीही अनंतच्या वरातीमध्ये धमाल डान्स केला.

आज १२ जुलैला रात्री ९:३० वाजता मुंबईतील बीकेसीमधील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये अनंत आणि राधिका विवाहबद्ध होणार आहेत. या लग्नासाठी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT