Ram Charan Esakal
Premier

Viral Video : एअरपोर्टवर रामचरणला घ्यायला आला त्याचा खास मित्र ; बॉण्ड पाहून नेटकरी म्हणाले...

Ramcharan Airport Viral Video : साऊथ सुपरस्टार रामचरणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रामचरण परदेशातून परत येताच त्याला घ्यायला त्याच्या एका खास मित्राने एअरपोर्टवर हजेरी लावली.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment News : साऊथ इंडियन सुपरस्टार रामचरण कायमच सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या क्युट व्हिडीओने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. रामचरण त्याच्या पत्नीबरोबर नुकताच परदेशातून परत आला. यावेळी त्याच्या खास मित्राने एअरपोर्टवर हजेरी लावली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं कि, रामचरणचा पेट डॉग एअरपोर्टवर त्याला पीक अप करण्यासाठी आला होता. रामचरण दिसताच त्याने त्याच्याकडे धाव घेतली. रामचरणनेही त्याला लगेच उचलून घेतलं. त्या दोघांचं हे क्युट बॉण्डिंग सगळ्यांनाच पसंत पडलं.

विरल भयानीने रामचरणचा हा एअरपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा पेट डॉग धावत त्याच्या जवळ येतो आणि शेपूट हलवून त्याचा आनंद व्यक्त करतो. त्यानंतर रामचरण त्याला उचलून घेतो असं पाहायला मिळालं. यावेळी त्याची बायको उपासना आणि बायको क्लीन काराही उपस्थित होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट्स करत रामचरण आणि त्याच्या पेट डॉगच्या बॉण्डचं कौतुक केलं.

रामचरण आता आर सी 16 आणि गेम चेन्जर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचे आर आर आर आणि आचार्य हे सिनेमे सुपरहिट ठरले. २ ० २ ४ मध्येच गेम चेंजर हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

SCROLL FOR NEXT