Actor Ranjith Esakal
Premier

Honor Killing : "ऑनर किलिंग म्हणजे हिंसा नव्हे" , दाक्षिणात्य अभिनेत्याच्या खळबळजनक वक्तव्याने नेटिझन्स भडकले

Actor Ranjith Controversial Statement On Honor Killing Went Viral : दाक्षिणात्य अभिनेता रणजितने सालेममध्ये त्याच्या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. काय म्हणाला अभिनेता जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Entertainment News : अभिनेता-दिग्दर्शक रणजितने तामिळनाडूमधील सालेममध्ये ऑनर किलिंग घटनेवर केलेल्या धक्कादायक वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रणजितने ऑनर किलींगचं समर्थन केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मीडियाशी गप्पा मारताना रणजितने सांगितलं कि जातीवर आधारित असलेलं ऑनर किलिंग ही हिंसा नाहीये असं म्हंटलं. त्याने पुढे असंही म्हंटल कि, आपल्या मुलाविषयी वाटणारी काळजी दाखवण्याची ही एक पद्धत आहे.

रणजितचा सिनेमा ९ ऑगस्टला त्याची कवुंदपलायम हा सिनेमा कमी थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. रणजितने सालेममधील करुप्पूर येथील त्याच्या सिनेमाच्या स्क्रिनींगला हजेरी लावली. यावेळी त्याने तेथील मीडियाशी संवाद साधला आणि त्यावेळी त्याला ऑनर किलिंगवर प्रश्न विचारण्यात आला.

त्याने केलेल्या या वक्तव्याने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर जेव्हा जनता सरकारकडे ऑनर किलिंगवर कडक कायदा आणण्याची मागणी होत असताना एका बड्या अभिनेत्याने असं वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

रणजित त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पहिल्यांदाच अडचणीत आले नाहीयेत. या आधीही त्यांनी रस्त्यांवर सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्या कार्यक्रमांमध्ये नाचणाऱ्या महिलांवर टीका केली होती. त्यामुळे ते अडचणीत आले होते. त्यांच्या प्रतिगामी विचारांना अनेकांनी विरोध केला होता. रणजित यांच्या सिनेमांमध्येही स्त्रियांना वस्तू म्हणून दाखवलं जातं आणि त्यांनी संस्कृती जपली पाहिजे असा संदेश दिला जातो.

कोण आहे रणजित ?

रणजित हे दाक्षिणात्य अभिनेते असून १ ९ ९ ३ साली त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी अनेक तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांचा राजकरणातही सहभाग असून बराच काळ ते जयललिता यांच्या पक्षाचे प्रवक्ते होते. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीही बरेच प्रसिद्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT