Shreyas Talpade in Om Shanti Om Esakal
Premier

Shahrukh Khan : "म्हणून, फराह माझ्यावर आणि शाहरुखवर चिडली "; श्रेयसने सांगितला 'ओम शांती ओमचा' मजेशीर किस्सा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला 'ओम शांती ओम' हा सिनेमा खूप गाजला होता. 2007 साली आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं मनं जिंकलं. या सिनेमाविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी अभिनेता श्रेयस तळपदेने एका मुलाखतीमध्ये शेअर केल्या.

श्रेयसने नुकताच लेहरन चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने ओम शांती ओमच्या शुटिंगदरम्यानचा धमाल किस्सा शेअर केला. तो म्हणाला,"डोरमधील माझं काम बघून फराहने माझी निवड ओम शांती ओममधील पप्पू मास्टर या भूमिकेसाठी केली. पहिल्या दिवसापासून मी खूप नर्व्हस होतो. मला खूप भीती वाटत होती कि मला इम्प्रोव्हाईज करण्याची खूप सवय आहे आणि त्यात मला शाहरुख सोबत काम करायचं होतं. त्यामुळे माझी ही सवय त्याला पटेल कि नाही. तो काय म्हणेल याची मला चिंता होती. पण काहीवेळाने मी विचार केला कमीत कमी त्याला विचारून तर पाहूया. मी त्याला माझ्या मनात काय आहे ते सांगायचं ठरवलं आणि जर ते सांगितलं नसतं तर मला काम करणं जमलं नसतं."

पुढे श्रेयस म्हणाला कि,"मी जेव्हा शाहरुखला माझी कल्पना सांगितली तेव्हा त्याला खूप आवडली. त्यानंतर ती स्वतः दहा गोष्टी घेऊन आला. अर्थात त्यामुळे आमची केमिस्ट्री चांगली झाली. आम्ही सतत इम्प्रोव्हायझेशन करायचो. आम्ही खूप मस्तीही करायचो. ते इतकं झालं कि एका संध्याकाळी आम्हाला सीन शूट करायचा होता आणि आम्ही इम्प्रोव्हाईज करत होतो. फराह आमच्यावर खूप वैतागली आणि आम्हाला त्या स्क्रिप्टमध्ये जे काही लिहिलंय ते करा असं चिडून बोलली."

अशी होती सिनेमाची कथा

दीपिकाने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. तर या सिनेमात अर्जुन रामपाल आणि किरण खेर यांचीही मुख्य भूमिका होती. हा सिनेमा एका पुनर्जन्माच्या कथेवर आधारित होता. ज्युनिअर आर्टिस्ट असलेला एक कलाकार एका सुपरस्टार अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. पण तिचं आधीच लग्न एका निर्मात्याशी झालेलं असतं आणि तो निर्माता तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. तिला मारून टाकण्याच्या नादात त्या ज्युनिअर आर्टिस्टचाही मृत्यू होतो आणि तो पुनर्जन्म घेऊन त्या दोघांच्याही खुनाचा बदला घेतो. अशी या सिनेमाची कथा होती.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT