Bollywood Entertainment News : अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी छावा या सिनेमामुळे चर्चेत आहे. काल या सिनेमाचा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. अतिशय थरारक असलेल्या या टीझरने अनेकांच्या अंगावर काटा आला. विकीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या बहुप्रतीक्षित सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. त्यातच विकीने केलेल्या वक्तव्याने सगळ्यांची मनं जिंकली.
विकीच्या छावा सिनेमाचं आज पोस्टर लाँच थाटात पार पडलं. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विकी मराठ्यांच्या इतिहासाविषयी, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भरभरून बोलला. नुकताच सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात तो म्हणतो कि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सुपरहिरो आहेत.
विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विकी म्हणाला कि,"मी कायमच हे सांगत असतो कि, पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांना अव्हेंजर्स वगैरे सारखे सिनेमे बनवावे लागतात कारण त्यांच्याकडे सुपरहिरो नाहीयेत. आपल्याकडे ना खरे सुपरहिरो आहेत. आपणच जर आपल्या भारताचा इतिहास पाहिला तर छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी यांच्यासारखे असे सुपरहिरो आहेत कि त्यांच्यासमोर सगळे सुपरहिरो फेल होतील. हे खूप गरजेचं आहे कि आपण त्यांच्या गोष्टी दाखवू आणि त्यांचं काम साजरं करू. " याबरोबरच विकीने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषही केला.
अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत विकीचं भरभरून कौतुक केलं. विकी खरा सुपरस्टार आहे असं अनेकांनी कमेंट करत म्हंटलं. विकीचा हा आगामी सिनेमा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. ए आर रहमान यांनी या सिनेमाचं संगीत दिलं आहे. ६ डिसेंबर २ ० २ ४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. दिनेश विजन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.