Tejaswini Pandit Esakal
Premier

Tejaswini Pandit : "नुसते कायदे कडक असून चालत नाही..." बलात्कार प्रकरणात न्यायासाठी तेजस्विनीची मागणी

Tejaswini Pandit On Increasing Rape Case Count In India : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने बदलापूर आणि कोलकाता येथे झालेल्या मर्डर केसबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. काय म्हणाली तेजस्विनी जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Badlapur School Case : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या काही दिवसानंतरच बदलापुर येथील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलीय. या सगळ्यात सोशल मिडीयावर महिलांच्या सुरक्षेविषयी आणि या प्रकरणावर अनेक जण व्यक्त होताना दिसत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी मोठ्या संख्येने या दोन्ही प्रकरणावर व्यक्त होताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर अनेक कलाकार न्यायासाठी आणि आरोपींना शिक्षा मिळाव्या याबाबत पोस्ट करत आहेत. हिंदीसह मराठी कलाकारही मोठ्या संख्येने सोशल मिडीयाच्या माध्यामातून मतं मांडताना दिसत आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितही कायम महत्त्वाच्या घडामोडींवर तिचं परखड मत मांडण्यासाठी ओळखली जाते. सध्याच्या बलात्कार प्रकरणावर होणारं राजकारण आणि कायदा यावर तेजस्विनीने मत मांडलय.

तेजस्विनीने तिच्या सोशल मिडिया इ्न्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेयर केलीय. या स्टोरी पोस्टमध्ये तेजस्विनी लिहीते की, "बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात, धर्म नसतो... फक्त वृत्ती असते आणि तीच ठेचली पाहिजे. ज्यासाठी जाच बसणं गरजेचं आहे. नुसते कायदे कडक असून चालत नाही, ते आपल्याकडे आहेतच... अंमलात कधी आणायचे ?"

असं म्हणत तेजस्विनीने व्यवस्थेला जाब विचारलाय. शिवाय बलात्कारासारख्या प्रकरणावरुन राजकारण करणाऱ्यांना देखील एक विनंती केलीय. तेजस्विनी या पोस्टमध्ये पुढे लिहीते की, "आणि सगळ्यांना एक मनापासून विनंती, कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं कुठल्याही पद्धतीने राजकारण करु नये."

या पोस्टमध्ये शेवटी हॅशटॅग निषेध असं लिहीत तिने डिमांड जस्टीस असही लिहीत न्यायाची मागणी केलीय. शिवाय व्यवस्थेलाही तेजस्विनीने जाब विचारला आहे.तेजस्विनीसह अनेक कलाकार आता सोशल मिडीयावर व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी कोलकाता आणि बदलापुर प्रकरणावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेते प्रसाद ओक, रितेश देशमुख, सोनाली कुलकर्णी, अभिजीत केळकर, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे यांच्यासह अनेक कलाकार सध्याच्या प्रकरणावर न्याय मिळावा यासाठी सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. फक्त कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी आणि सामान्य जनताही सोशल मिडीयावर या प्रकरणावर त्यांची मतं मांडताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT