Premier

Girija Oak Godbole : "स्टारकिड असले तरीपण सामान्य बालपण" ; स्टारकिड असण्याबाबत गिरीजा झाली व्यक्त

सकाळ डिजिटल टीम

Girija Oak Godbole : मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध आहे. परखड मत आणि ठाम विचार यामुळे तिची अनेक वक्तव्य गाजतात. नुकतंच तिने मराठी सेलिब्रिटी किड म्हणून तिची ओळख आणि लहानपणीच तिचं आयुष्य यावर एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. वडील अभिनेते असूनही तिचं आयुष्य किती सामान्य होतं या गोष्टी तिने शेअर केल्या.

नुकतंच गिरीजाने 'अमुक-तमुक' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला सेलिब्रिटी असण्याचा काय फायदा होतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली कि,"तुम्हाला सेलिब्रिटी होण्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मला आता सेलिब्रिटी असण्याचा फायदा होतोय पण मी जेव्हा लहान होते तेव्हा असं नव्हतं. माझे वडीलही अभिनेते होते पण तो काळ खूप वेगळा होता. त्यावेळी ते नाटकात जास्त काम करायचे. त्यावेळी इतक्या मालिका किंवा चॅनेल्सही नव्हते. दोनच चॅनेल्स होते. त्यावेळी अॅड्सही इतक्या मिळायच्या नाहीत. त्यामुळे आमचं आयुष्य खूप सामान्य होतं. फार हलाखीची परिस्थिती नव्हती आणि फार श्रीमंत परिस्थितीही नव्हती. खूप मध्यमवर्गीय वातावरणात माझं बालपण गेलं. मी आठवीत असताना अल्फा मराठी सुरु झालं त्यानंतर मालिका वाढल्या. त्यामुळे माझं बालपण अगदी सामान्य परिस्थितीत गेलं. माझ्यावर अजूनही मध्यमवर्गीय संस्कार आहेत आणि ते मी जपते."

गिरीजाने शेअर केलेली ही गोष्ट सध्या चर्चेत आहे. गिरीजाचे वडील डॉ. गिरीश ओक हे नव्वदीच्या दशकातील आघाडीचे अभिनेते होते. त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं होतं.

काही वैयक्तिक कारणांमुळे गिरीश आणि गिरीजाची आई पद्मजा वेगळे झाले. याचा बराच मोठा धक्का त्यावेळी गिरीजाला बसला होता. पण आजही तिचे तिच्या आई-वडिलांशी उत्तम संबंध आहेत.

गिरिजचा जवान हा शाहरुख खानसोबतचा सिनेमा खूप गाजला. यासोबतच तिने व्हॅक्सिन वॉर या सिनेमातही काम केलं. तर सध्या रंगभूमीवर तिची ठकीशी संवाद हे मराठी आणि गौहर हे हिंदी नाटक सुरु आहे.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT