Kangana Ranaut Esakal
Premier

Kangana Ranaut : भाजप खासदार कंगना रनौत घेऊन येतेय इंदिरा गांधीवर चित्रपट; कधी होणार प्रदर्शित?

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut : नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) बहुप्रतीक्षित इमर्जन्सी (Emergency) सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत सिनेमाच्या टीमने रिलीज डेट जाहीर केली. लोकसभा निवडणुकीमुळे कंगनाने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.

कंगनाची पोस्ट

सोशल मीडियावर कंगनाने पोस्ट शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली. 'स्वतंत्र भारताच्या सर्वात गडद अध्यायाच्या 50 व्या वर्षाची सुरुवात. कंगना रनौतचा इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहात. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक गोष्ट.' असं कॅप्शन कंगनाने या पोस्टला दिलं असून सोबत पोस्टरवर तिचा इंदिरा गांधींच्या लूकमधील फोटो दिसत आहे.

इमर्जन्सी सिनेमात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार असून देशातील अंतर्गत आणि बाह्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर 25 जून 1975 रोजी भारतात 21 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या वेळी घडलेल्या घटना आणि इंदिरा गांधींचा संबंध यावर हा सिनेमा आधारित असेल.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं. एकाने म्हंटलं कि,"कंगनाला लवकरच पाचवा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार" तर एकाने म्हंटल कि,"आम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहोत. "

सिनेमाची कास्ट

अनुपम खेर, श्रेयस तळपदे, अशोक छाब्रा, महिमा चौधरी यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. कंगनाने स्वतःच या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 14 जूनला रिलीज होणार होता पण लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला.

अखेरचा सिनेमा ?

कंगनाचा हा अखेरचा सिनेमा ठरेल अशी ही चर्चा सध्या सिनेविश्वात आहे. लोकसभा निवडणुकीत जर खासदार म्हणून निवड झाली तर सिनेइंडस्ट्री सोडण्याचा निर्णय कंगनाने जाहीर केला होता. आता ती तिचं हे वचन पाळणार कि नाही याकडे तिच्या चाहत्यांच लक्ष आहे. जर कंगनाने हे वचन पाळलं तर तिचा हा अभिनेत्री म्हणून शेवटचा सिनेमा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT