Gharat Ganpati Esakal
Premier

Viral Photo : हिंदीतली 'ही' अभिनेत्री बनली मराठमोळी मुलगी, नथ आणि नऊवारी नेसून केला मराठमोळा साज श्रृंगार

This Bollywood Actress Photos Went Viral : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रींचे मराठमोळ्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nikita Dutta : हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकार जेव्हा मराठी चित्रपटात काम करतात तेव्हा इथली भाषा, पेहराव आणि संस्कृतीशी एकरुप होताना दिसतात. हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री निकिता दत्ताही आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. त्यामुळे मराठमोळ्या संस्कृतीशी ती चांगलीच एकरुप झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय.

अभिनेत्री निकिता दत्ताचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरलाय. जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने असा साजशृंगार करून निकिताने आपला मराठमोळा ठसका ऐटित मिरवलाय. निकिताने या चित्रपटाच्या निमित्ताने खास मराठमोळा लूक केला होता. या लूकमधील तिचे फोटो आता चर्चेत आले आहेत. या खास लूकमध्ये निकिताचा मराठमोळा अंदाज दिसतोय.'घरत गणपती' या आगामी मराठी चित्रपटात निकिता झळकतेय. या चित्रपटात काम केल्यानंतर मराठी संस्कृतीने निकिताने प्रभावित झाल्याचं सांगते. याविषयी निकिता म्हणते की, "घरत गणपती हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. पण या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली. इथले सण समारंभ, रीतिरिवाज, पोशाख पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातलीय."

घरत गणपती या चित्रपटातून निकिता मराठी सिनेविश्वात पदार्पण करतेय. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधानसोबत तिची जोडी पाहायला मिळणार आहे. शिवाय या चित्रपटासाठी निकिताने मराठी भाषेचे धडे देखील घेतले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने निकिता पहिल्यांदाच अशा हटके भूमिकेत पाहायला मिळेल. निकिताने याआधी हिंदी टेलिव्हिजनसाठी देखील काम केलय. 'ड्रीम गर्ल', 'एक दुजे के वासते' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 'गोल्ड', 'कबीर सिंग', 'डिबुक', 'द बिग बुल' या हिंदी चित्रपटांमध्ये निकिताने महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

'घरत गणपती' या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम हे कलाकार झळकणार आहेत. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर २६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT