Patralekha As Savitribai Esakal
Premier

Patralekha Exclusive Interview: सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना घाबरली राजकुमार रावची पत्नी, म्हणते "मी रडत होते..."

सकाळ डिजिटल टीम

Patralekha as Savitribai Phule : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं अतुलनीय कार्य हे अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून साकारण्यात आलय. मराठीसह हिंदीतही विविध माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. आगामी 'फुले' हा चित्रपट देखील त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. २०२२ मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी दिलेलं योगदान या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झालेला नसून या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मात्र सकाळ माध्यमासोबत तिचा अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्री पत्रलेखा ही 'फुले' या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहे. नुकताच तिचा 'वाईल्ड वाईल्ड पंजाब' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय. सकाळ माध्यमाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलत असताना तिने फुले चित्रपटाचा उल्लेख करत सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारण्याचा अनुभवही सांगितला आहे. ही भूमिका साकारण्याची मोठी जबाबदारी असल्याने पत्रलेखा घाबरली असल्याचं ती म्हंटली. ती सांगते की, "मला अजूनही भीती वाटतेय, तेव्हा देखील मी घाबरली होती. मला आठवतय की मी जेव्हा फुले चित्रपटासाठी शूटींग सुरु करणार होते तेव्हा दोन चार दिवसाआधी मी घरात बसून रडत होते. मला असं वाटत होतं की मी कसं करू शकेल हे. ही सावित्रीबाई फुले यांची गोष्ट आहे. तेव्हा मी त्यांच्याबद्दल बरच काही वाचलही होतं. तेव्हा मला असं वाटत होतं की त्या अशा महिला आहेत ज्यांच्यामुळे समाजात खूप काही चांगले बदल झाले. म्हणूनच चित्रीकरणाआधी मी खूप घाबरली होते. अशा गोष्टी देखील कानावर पडत होत्या की सावित्रीबाई फुलेंची भूमिका मी कशी करु शकेल वगैरे.."

पत्रलेखा पुढे म्हणते की, "जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट निर्माते आणि दिग्दर्शक अनंत यांनी मला पाठवली तेव्हा मी स्क्रिप्ट वाचली. मला तेव्हा माहिती होतं की मी हे करु शकेन. मला हे देखील माहिती होतं की यासाठी मी शंभर टक्के देईल. पण ते करण्याच्या चार दिवसांपूर्वी मला भीती होती. मला वाटत होतं की या भूमिकेला काही प्रमाणात का होईना मी न्याय देऊ शकेल की नाही ही भीती होती."

पहा पूर्ण मुलाखत :

साताऱ्यात या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. याविषयी सांगताना महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेतल्याचही पत्रलेखाने सांगितलं. 'फुले' या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलय. लोकप्रिय अभिनेता प्रतीक गांधी या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT