Premier

Heeramandi : दारू पिऊन डान्स अन् 99 टेक्स; रिचाने सांगितला 'हिरामंडी'मधील गाण्यावरील नृत्याच्या शूटिंगचा किस्सा

सकाळ डिजिटल टीम

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बझार' ही वेबसिरीज खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजमधील प्रत्येक भूमिका खूप गाजतेय. यातील एक भूमिका सध्या खूप चर्चेत आहे. ही भूमिका आहे लाजवंती. अभिनेत्री रिचा चढ्ढाने ही भूमिका साकारली असून तिचा परफॉर्मन्स कमालीचा गाजतोय. तिच्या वेबसीरिजमधील अभिनयाने तिने सगळ्यांचं मन जिंकलंय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या सीरिजमधील भूमिकेसाठी थोडी दारू प्यायल्याचं मान्य केलं.

रिचाने नेटफ्लिक्स इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये असलेल्या डान्स सिक्वेन्स विषयी भाष्य केली. ती म्हणते,"पहिल्या दिवशी मला अजिबातच जमत नव्हतं. मला अजिबातच दारूच्या नशेत नाच करणं जमत नव्हतं. पण ३०-४० टेक्सनंतर मी थोडीशी दारू पिऊन काय होतंय हे पाहायचं ठरवलं. मी थोडीशीच दारू प्यायले पण त्याने गोष्टी बिघडल्या. मला माझ्या शरीराच्या हालचालीत मला आळशीपणा नको होता, त्यात थोडासा उशीर हवा होता पण त्यातील लयबद्धता मला बिघडवायची नव्हती."

"मी जवळपास ९९ रिटेक्स हा डान्स शूट करण्यासाठी केले पण अखेर मला ते जमलं. पण यातून मला खूप काही शिकायला मिळालं." असं तिने यावेळी म्हंटलं.

रिचाने साकारलेली लज्जो सीरिजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये ती प्रेम करत असलेल्या नवाबाच्या लग्नात दारूच्या नशेत नृत्य करते असं दाखवण्यात आलं आहे. तिचा हा परफॉर्मन्स आणि तिचा वेदनादायी शेवट याने सगळ्यांचंच मन जिंकलं. अनेकांनी सोशल मीडियावर रिचाच्या या परफॉर्मन्सचं कौतुक केलंय. फक्त दोन एपिसोड्समध्ये दिसणाऱ्या रिचाने तिच्या छोटयाशा पण महत्त्वपूर्ण भूमिकेने सगळ्यांचं मन जिंकलंय.

या वेबसिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख, शर्मिन सेहगल, रिचा चड्ढा, मनीषा कोईराला, फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा खान आणि फरीदा जलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. तवायफांचं आयुष्य आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान, सत्तेसाठीची चढाओढ यावर ही वेबसीरिज आधारित आहे.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT