Shilpa attends Daiva Kola festival with her family 
Premier

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Shilpa Shetty attends Daiva Kola Festival with her children: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या गावात पार पडलेल्या दैव कोला उत्सवाला तिची मुलं आणि आईसोबत हजेरी लावत देवाचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर शिल्पाचं कौतुक होतं आहे.

सकाळ डिजिटल टीम

फिटनेस आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या संस्कारासाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून कायमच ती प्रयत्नशील असते. नुकत्याच तिने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

शिल्पाने नुकतीच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिने तिची आई आणि मुलांसोबत तिच्या मूळ गावी मंगलोरला भेट दिली. या वेळी तिने तिच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं. यासोबतच तिने तिच्या गावी पार पडणाऱ्या दैव कोला या उत्सवात देखील सहभाग घेतला. सोशल मीडियावर तिने शेअर केलेले हे फोटोज व्हायरल झाले आहेत.

लाल आणि भगव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या साडीत शिल्पा सुंदर दिसत असून तिने गळ्यात पारंपरिक टेम्पल ज्वेलरी प्रकारातील हार घातला आहे. केसात माळलेला गजरा आणि मिनिमम मेकअप या लूकमध्ये शिल्पा सुंदर दिसत आहे. तिची दोन्ही मुलं सुद्धा यावेळी पारंपरिक वेषात हजर होती तर शिल्पाच्या आईने सुद्धा यावेळी कुलदेवतेचं दर्शन घेतलं. तर तिच्या मुलाने पंजुर्लीचे आशीर्वाद घेतले.

"माझ्या मुळांकडे परतताना... मी माझ्या मुलांना माझ्या पारंपरिक वारश्याची आज ओळख करून दिली. नागमंडळ आणि कोडामानतया दैव कोला या मंगलोरमध्ये पार पडलेल्या उत्सवाला आम्ही हजेरी लावली. माझी मुलं हा सोहळा बघून चकित झाली होती आणि हा उत्सव मी या आधी कितीही वेळा पहिला असला तरीही शक्ती आणि भक्तीवर असलेल्या या श्रद्धेचं आकर्षण मला कायम आहे. " असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत ती मुलांवर करत असलेल्या संस्कारांचं कौतुक केलं.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मंगलोरमधील दैव कोला या उत्सवाची सुद्धा झलक पाहायला मिळतेय. गुलिगा आणि पंजुर्ली या देवांची या उत्सवात पूजा केली जाते आणि त्यांच्या रूपांचं सादरीकरण करतात. यावेळी हे देव प्रत्यक्ष त्या व्यक्तीत प्रवेश करून गावातील समस्यांचं निराकरण करतात अशी धारणा आहे.

या सिनेमामुळे दैव कोला उत्सवाची देशभरात झाली ओळख

या आधी या उत्सवाची झलक कांतारा या कन्नड सिनेमात पाहायला मिळाली होती. हा सिनेमा चांगलाच गाजला होता. १६ करोडमध्ये बनलेल्या या सिनेमाने ४००-६०० करोडची कमाई केली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT