Swara Bhaskar  Esakal
Premier

Sonakshi & Zaheer Wedding : "त्यांच्या मुलांनाही ट्रोल केलं जाईल"; सोनाक्षी-झहीरची साथ देताना ट्रोलर्सची स्वराने केली कानउघाडणी

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhaskar : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या परखड मतांसाठी ओळखली जाते. राजकारण ते अभिनय अशा कोणत्याही विषयावरील तिचं मत कायमच चर्चेत राहतं. नुकतंच स्वराने सोनाक्षी आणि झहीर इकबालच्या लग्नाविषयी होणाऱ्या ट्रोलिंगवर तिने तिचं मत व्यक्त करत ट्रोलर्सना खडेबोल सुनावले.

काय म्हणाली स्वरा ?

नुकत्याच सिने कनेक्ट या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्वराने झहीर आणि सोनाक्षीच्या लग्नाबाबत तिचं मत मांडलं. तिला सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला दोन्ही बाजूने विरोध आहे त्यावर तुझं काय मत आहे असं विचारलं. त्यावर स्वरा म्हणाली,"माझ्या लग्नाच्या वेळीही अचानक दोन्ही धर्मातील तज्ज्ञ मंडळी अचानक प्रकट होऊन स्वतःचं मत सांगत होती. पण मला असं वाटतं कि जेव्हा कुणीही दोन व्यक्ती एकत्र येतात आणि ते लग्नाचा निर्णय घेतात किंवा लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात तो त्यांचा प्रश्न असतो. ते रजिस्टर लग्न करणार आहेत कि निकाह करणार आहेत कि आर्य समाज पद्धतीने लग्न करणार आहेत कि फेरे घेणार आहेत हा पूर्णपणे त्या दोघांचा आणि त्यांच्या कुटूंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. यात या मंडळींच्या व्यतिरिक्त इतर कुणीही स्वतःचं मत मांडणं खरंतर खूप चुकीचं आहे." असं ती म्हणाली.

पुढे यावर बोलताना तिने म्हंटलं कि, "आपण यावर खरंतर मत का देतोय ? हाच मला प्रश्न पडलाय.सोनाक्षीचं वैयक्तिक आयुष्य आहे, तिने तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे आणि तिच्या जोडीदारानेही तिला निवडलं आहे. मला वाटत तो आता त्यांचा आणि त्यांच्या कुटूंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा खूप वेळ वाया घालवणारा वाद आहे आणि मला असं वाटतं कि भारतात आणि साऊथ एशियामध्ये हे आपल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे कि आपल्याला इतर लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात रस घ्यायला आवडतो आणि त्याच्यावर चर्चा करायला, मत मांडायला आवडतं. हे तर आता आहे पण तुम्ही थोडावेळ वाट पहा आणि बघा जेव्हा सोनाक्षी आणि झहीरचं मूल होईल तेव्हा त्यांच्या मुलाच्या नावावरूनही त्यांना ट्रोल केलं जाईल. याचा सामना मी देखील केला होता आणि करीना-सैफबरोबरही हे घडलं होतं."

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरचं लग्न २३ जूनला दादर येथील बॅस्टियन हॉटेलमध्ये रजिस्टर पद्धतीने पार पडणार असून तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा या लग्नाला हजेरी लावणार असल्याचं म्हंटलं जातंय पण सोनाक्षीची आई आणि भाऊ या लग्नावर नाराज असल्याची चर्चा असून त्यांनी तिला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT