Premier

Shaktiman : सामान्य माणसाची असामान्य गोष्ट ; आदिनाथ-स्पृहाच्या शक्तिमानचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

सकाळ डिजिटल टीम

आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असलेल्या शक्तिमान या सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. अतिशय वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. आज अभिनेता आदिनाथ कोठारेचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला.

एका सामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिद्धार्थ ही भूमिका आदिनाथ साकारत असून एका छोट्या मुलीचे प्राण वाचावेत म्हणून प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या व्यक्तीची ही भूमिका आहे. हृदयाचा आजार असलेल्या मुलीचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी सिद्धार्थ धडपडत असल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

कुटूंबाकडून होणारा विरोध, सगळीकडून मिळणारा नकार आणि फक्त मुलासमोर चांगलं उदाहरण ठेवता यावं म्हणून धडपडणारा बाप आदिनाथने या सिनेमात साकारला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. "

'शक्तिमान'- आपल्या सगळ्यांच्यात दडलेला असतो एक सुपरहिरो. त्याला योग्यवेळी स्वतःमध्ये शोधावं लागतं. अगदी आपल्या बाबांसारखं! सामान्यांतील असामान्यत्व दाखवणारी..आपल्या आजूबाजूला घडू शकणारी गोष्ट आपल्या घरातली गोष्ट 'शक्तिमान'" असं कॅप्शन या ट्रेलरला देण्यात आलं आहे.

पहा ट्रेलर :

आदिनाथ आणि स्पृहासोबत प्रियदर्शन जाधवाचीही या सिनेमात मुख्य भूमिका आहे. प्रकाश कुंटे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रकाश यांनी आजवर वेगवेगळ्या हटके विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत.

त्यांचे "कॉफी आणि बरंच काही ", "अँड जरा हटके " , "हंपी" आणि "सायकल" हे सिनेमे खूप गाजले होते. आणि आता शक्तिमान हा सिनेमा २४ मे २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने आदिनाथ आणि स्पृहा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.

आदिनाथ-स्पृहाचे आगामी प्रोजेक्ट्स

याशिवाय आदिनाथ अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे. तो नितेश तिवारीच्या 'रामायण' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात तो भरत ही भूमिका साकारतोय तर 'झपाटलेला ३' या आगामी सिनेमाच्या तयारीतही तो व्यस्त आहे. स्पृहासुद्धा बऱ्याच काळाने सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सध्या तिची कलर्स मराठीवर 'सुख कळले' ही मालिका सुरु आहे आणि या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT