Aditi Rao Hydari Video Viral: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या "हिरामंडी: द डायमंड बझार' (Heeramandi) या वेब सीरिजची सध्या चर्चा होत आहे. या वेब सीरिजचं अनेकजण कौतुक करत आहेत. या वेब सीरिजमधील विविध सीन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाताच हिरामंडी या वेब सीरिजमधील एका गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या (Aditi Rao Hydari) वॉकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अदिती राव हैदरीनं हिरामंडी: द डायमंड बाजार या वेब सीरिजमध्ये बिब्बोजान ही भूमिका साकारली आहे. हिरामंडीमधील सैया हटो जाओ या गाण्यातील अदितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अदितीच्या वॉकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या वॉकचं अनेकजण कौतुक करत आहेत. अदितीच्या या वॉकला 'गजगामिनी चाल' असं म्हणतात.
'गजगामिनी' या संस्कृत शब्दाचे भाषांतर 'हत्तीच्या चालप्रमाणे' असे होते, ज्याचा अर्थ 'शाही चाल' असाही होते. ही चाल हत्तीच्या चालीसारखी असते. ही चाल ग्रेस, फेमिनिटी आणि शक्तीचं प्रतिक मानली जाते.
अदितीच्या 'गजगामिनी' वॉकचं अनेकांनी सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,"मला अदितीची गजगामिनी चाल खूप आवडली, असं वाटलं की, ती मधुबाला बायोपिकसाठी ऑडिशन देत आहे."
अदिती राव हैदरी आधी देखील काही अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये 'गजगामिनी चाल' केली आहे. माधुरी दीक्षितने 2000 मध्ये एमएफ हुसैन दिग्दर्शित 'गज गामिनी' या चित्रपटात ही चाल केली होती. शिवाय, 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील 'मोहे पनघाट पे' या गाण्यात मधुबालाने 'गजगामिनी चाल' केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.