aditi sarangdhar sakal
Premier

बिअरच्या एका घोटाचं लोकांनी चर्वण केलं... गरोदरपणातील वक्तव्यावरून ट्रोल करणाऱ्यांना अदिती सारंगधरने सुनावलं

Aditi Sarangdhar On Trolling: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या बिअरबद्दलच्या वाक्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Payal Naik

Aditi Sarangdhar: छोटा पडद्यासोबतच मोठा पडदा गाजवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अदिती सारंगधर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने अनेक मराठी मालिकांमधून घराघरात ओळख निर्माण केली. अदिती 'नवे लक्ष्य' मधून गेली काही वर्ष प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. काही दिवसांपूर्वीच अदितीने केलेलं एक विधान प्रचंड गाजलं होतं. ज्यात तिने तिला गरोदरपणात लागलेल्या डोहाळ्यांबद्दल सांगितलं होतं. आपल्याला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते असं ती म्हणाली होती मात्र त्यावर तिला ट्रोल करण्यात आलं. आता तिने त्या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं आहे. लोकांनी उगीच त्या गोष्टीला मोठं केलं असं ती म्हणाली आहे.

अदितीने नुकतीच इट्स मज्जाच्या 'ठाकूर बोलता है' या सेगमेंटला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'मला खरंच डोहाळे लागले होते. मी अशी काय गटागटा बिअर पीत नव्हते, लोकांनी त्याचं चर्वण केलं. काय आहे ना ज्याला होतं त्याला ते कळतं. मी कधीही दारू प्यायले नाही पीत नाही. पार्टीमधली सगळ्यात दुःखी प्राणी मी आहे. माझी ९ची झोपायची वेळ झाली की माझी मी जेवते आणि झोपते. तुमचं चालुद्या. पार्टीमध्ये मी लिंबूपाणी पिते. पण तेव्हा मला वाटलं. मी इतकं थंड पाणी प्यायचे तेव्हा जे मी कधी आयुष्यात प्यायले नव्हते. मी काही बिअरची अख्खी बाटली नाही प्यायचे. एक घोट अगदी. तो वास एवढंच.'

ती पुढे बोलताना म्हणाली, 'नाहीतर माझी चिडचिड व्हायची. ते डोहाळे होते. मी खूप डाएट करणारी मुलगी आहे. मी बाहेरचा वडापाव अनेक वर्ष खाल्ला नव्हता. मी बाहेर जेवले नव्हते. पण मला अतरंगी डोहाळे लागले होते. उलट्या तर भयानक. १० पावलं चालल्यावर मला उलटी व्हायची. त्यामुळे मी माझं लक्ष्यचं शूट थांबवलं. नाटक सोडलं. त्या परिस्थितीत मी स्टेजवर उलट्या केल्या असत्या. ही माझी तेव्हाची परिस्थिती होती.' अदिती आता लवकरच स्वप्नील जोशीसोबत 'बाई गं' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT