aditi sarangdhar  esakal
Premier

VIDEO: "ही घृणास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट"; कॅब चालकाबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट

priyanka kulkarni

Aditi Sarangdhar: ‘वादळवाट’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अदिती सारंगधरने (Aditi Sarangdhar) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये एक कॅब चालक दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन अदितीनं कॅब चालकानं दिलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं आहे या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये अदितीनं एका प्रसिद्ध कॅब कंपनीला टॅग देखील केलं आहे.

अदितीनं शेअर केला व्हिडीओ

अदितीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कॅब चालक गाडी चालवत अदितीसोबत बोलताना दिसत आहे. अदिती त्याला एसी वाढवायला सांगते, तर तो नाही म्हणतो. कॅब चालकाचा व्हिडीओ शेअर करुन अदितीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "हे पुण्यातील कॅब चालक आहेत,अतुल वाघ आसं नाव आहे." प्रसिद्ध कॅब कंपनीला टॅग करुन अदिती म्हणाली, "ही घृणास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य आहे."

"एसी एकवरच ठेवणार बसायचंय तर बसा नाही तर खाली उतरा. मागे सफोकेट होत असताना देखील एसी वाढला नाही. तक्रार करेन म्हंटला तर तुम्हाला काय करायचंय ते करा बिन्धास्त, असा उलट बोलला. मला सुरुवातीला एक लोकेशन सांगून दुसरीकडे उभा राहिला आणि म्हणाला मला 7 मिनिटे वाट बघायला लावलीत मॅडम तुम्ही. त्याला विनंती केली प्लिज खिडकी उघडते खूप गुदमरत होते, तर तो चिडला. अत्यंत उद्धटपणे बोलत होता. अत्यंत अस्वच्छ आणि वास येणारी गाडी होती. काय करावा सांगा?", असंही अदितीनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

पाहा व्हिडीओ:

अदितीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करुन कॅब चालकाबाबत अलेले स्वत:चे अनुभव देखील शेअर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

Kush Maini: धक्कादायक! भारताचा फॉर्म्युला-2 रेसर अपघातादरम्यान थोडक्यात बचावला, दुर्घटनेदरम्यानचा Video आला समोर

SCROLL FOR NEXT