Kalki 2898 AD Box Office
Kalki 2898 AD Box Office Esakal
Premier

Kalki 2898 AD Box Office : कल्कीसाठी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद, सिनेमा पार करणार २०० कोटींचा आकडा ? ; अॅडव्हान्स बुकिंगमुळे साईट झाली क्रॅश

सकाळ डिजिटल टीम

Kalki 2898 AD : अभिनेता प्रभासची मुख्य भूमिका असलेला कल्की 2898 AD (Kalki 2898 AD)हा सिनेमा पाहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस गाजवतोय. सायन्स फिक्शन असलेला हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत असून महाभारत आणि कलियुग यावर आधारित असलेला हा सिनेमा सध्या चर्चेत असून Sacnilk च्या अपडेटनुसार, हा सिनेमा पहिल्याच दिवशी जगभरात २०० करोडची कमाई पूर्ण करणे अपेक्षित आहे. लाईव्ह बॉक्स ऑफिस ट्रेंड नुसार या सिनेमाने आज सकाळपासून २५.०२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बुकिंग साईट झाली क्रॅश

तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सिनेमाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे तिकीट बुकिंग साईट क्रॅश झाली आहे. . Sacnilk च्या बातमीनुसार, चित्रपटाने देशांतर्गत सर्किटमध्ये विविध भाषांमध्ये 20 लाखांहून अधिक आगाऊ तिकिटांची विक्री केली आहे. 

दरम्यान मुंबईत कल्की सिनेमाच्या तिकिटांची किंमत २३०० रुपयांहून अधिक होती. सिनेमाच्या महागड्या तिकिटाच्या किंमतीवर भाष्य करताना सिनेमा वितरक अक्षय राठी म्हणाले कि,"तिकिटांची किंमत आणि प्रोग्रामिंग पूर्णपणे मागणी आणि पुरवठा कायद्याच्या मूलभूत अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. कल्की चित्रपटाच्या मुंबईतील तिकिटांच्या साधारण दरांची सुरुवात ₹120 ते ₹2,300 पर्यंत आहे. तुम्ही केवळ चित्रपटासाठीच नाही तर चित्रपट पाहण्याच्या अनुभवासाठी पैसे देत आहात."

पायरसी विरोधात कल्कीच्या निर्मात्यांची पोस्ट

कल्की सिनेमाचे निर्माते वैजयंती मुव्हीज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोकांना पायरसी पासून दूर राहण्याची विनंती केली होती. "हा 4 वर्षांचा दीर्घ प्रवास आहे आणि ही दिग्दर्शक नाग अश्विन आणि टीमने घेतलेल्या अपार मेहनतीची कहाणी आहे. ही कथा जागतिक स्तरावर आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही, मागे वळून पाहण्याची किंवा गुणवत्तेशी तडजोड केली नाही. हे पुढे आणण्यासाठी या टीमने रक्त आणि घाम गाळला आहे. चला सिनेमाचा आदर करूया, कलाकृतीचा आदर करूया. स्पॉयलर देऊ नका, अपडेट्स शेअर करू नका किंवा पायरसी करू नका आणि प्रेक्षकांचा अनुभव खराब करू नका ही नम्र विनंती! चला या सिनेमाच्या विषयाचे रक्षण करण्यासाठी हात जोडूया आणि त्याचे यश एकत्र साजरे करूया." अशी पोस्ट त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

नाग अश्विन यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमात प्रभास (Prabhas), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दिशा पाटणी (Disha Patni), कमल हासन (Kamal Hasan)यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT