matka king
matka king  sakal
Premier

Matka King: सई पाठोपाठ नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये लोकप्रिय मराठी अभिनेत्याची एंट्री; करणार OTTवर पदार्पण

सकाळ डिजिटल टीम

Nagraj Manjule: लोकप्रिय मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या हटके चित्रपटांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. 'सैराट' ते 'फँड्री' त्यांचे चित्रपट कायमच वेगळ्या विषयावर आधारलेले असतात. त्यामुळेच चाहते त्यांच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहताना दिसतात. अशातच ते आता 'मटका किंग' या हिंदी वेबसीरिजचं दिग्दर्शन करताना दिसणार आहेत. नुकतीच या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्यांनी एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. मात्र आता या वेबसीरिजबद्दल आणखी एक चांगली बातमी समोर येते आहे. या सीरिजमध्ये लोकप्रिय मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

यापूर्वी मंजुळेंच्या या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यापाठोपाठ आता आणखी एक लोकप्रिय अभिनेता या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता आहे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याची प्रत्येकच भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. त्याने यापूर्वी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. रोहित शेट्टीच्या अनेक चित्रपटात तो झळकला आहे. मात्र आता तो हिंदी ओटीटी क्षेत्र गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024" मध्ये "बालभारती" या चित्रपटासाठी त्याला जुरीचं "बेस्ट ऍक्टर" हे अवॉर्ड मिळालं. तो सध्या 'ये रे ये रे पैसा ३' च्या शुटिंगमध्येही व्यग्र आहे. अशातच आता त्येनं मटका किंगमध्ये झळकणार असल्याची माहिती दिली आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये आता सिद्धार्थ नेमकी काय भूमिका साकारणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

Kiran Mane : "त्यांच्या आठवणीत वारीत नाचून बेभान होतो"; किरण माने यांनी सांगितली वारीची भावूक आठवण

Jharkhand Floor Test: एकही मत विरोधात न जाता हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; नेमकं काय घडलं?

Ishan Kishan: 'हो, मी ब्रेक घेतला आणि...', अखेर इशान किशनने देशांतर्गत क्रिकेट न खेळण्यावर सोडलं मौन

Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई; साचलेल्या पाण्यामुळे इंटरनेटवर मीम्सचा आला पूर.!

SCROLL FOR NEXT