naga chaitanya engagement  esakal
Premier

Naga Chaitanya: सामंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य थाटणार दुसरा संसार? आजच गुपचूप पार पडणार साखरपुडा

Payal Naik

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी होती. मात्र लग्नानंतरच्या काही वर्षातच ते वेगळे झाले आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या घटस्फोटाची अनेक कारणं सांगण्यात आली. मात्र चाहते अजूनही त्यांच्या एकत्र येण्याची वाट पाहत होते. मात्र आता नागा चैतन्य आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करणार आहे असं दिसतंय. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येतंय. आज ८ ऑगस्ट रोजी तो त्याची कथित गर्लफ्रेंड शोभिता धुलीपाला हिच्याशी साखरपुडा करणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर अभिनेत्याचे वडील त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करणार आहेत.

गेले अनेक वर्ष नागा चैतन्य आणि शोभिता हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी आपल्या नात्याबद्दल भाष्य केलं नसलं तरी ते अनेक ठिकाणी एकत्र पाहिले गेले. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा वाढू लागल्या. काहींनी नागा चैतन्य आणि सामंथाच्या घटस्फोटासाठी त्यांचं अफेअर कारणीभूत असल्याचंदेखील म्हटलं. आता अखेर ते दोघे त्यांच्या नात्याला एक नाव देण्यास तयार आहेत. रेडिटवर एका युझरने याबद्दल पोस्ट करत ही बातमी दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील एका युझरने ही पोस्ट केली आहे. नागा चैतन्य आणि शोभिता आज अभिनेत्याच्या घरी साखरपुडा करणार आहेत असं त्याने लिहिलं आहे.

इतकंच नाही तर वडील नागार्जुन त्यांचे फोटो शेअर करणार असल्याचं देखील बोललं जातंय. या बातमीमुळे शोभिता आणि नागा चैतन्य यांचे चाहते प्रचंड आनंदी आहेत. मात्र त्यासोबतच अभिनेत्री सामंथाचे चाहते नाराज झाले आहे. ते या बातमीवर नाराजी व्यक्त करत आहेत. शोभिताने यापूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं, 'मी कोणतीही चुकीची गोष्ट करत नाहीये त्यामुळे मला कुणालाही उत्तर द्यायची गरज नाहीये.' आता या बातमीत किती तथ्य आहे हे आज समोर येईल. मात्र असं झाल्यास सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट पाहायला मिळेल हे मात्र नक्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti : रक्ताचे पाट वाहतील पण… राजू शेट्टी सरकारवर का भडकले?

Latest Marathi News Live Updates : वन नेशन वन इलेक्शन म्हणजे निवडणुका संपवण्याचा प्रयत्न - आरजेडी नेते तेजस्वी यादव

'विरोधकांत शरद पवारांची भीती निर्माण झालीये, त्या वाचाळवीरांना जनताच मतांद्वारे फोडून काढेल'; शिंदेंची पडळकर, सदाभाऊंवर टीका

Home Hacks: जुन्या बेडशीटचा 'असा' करा वापर, घराला मिळेल सुंदर लूक

IPL Auction: आयपीएलचा मेगा लिलाव परदेशात होणार? तारखेबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT