raj babbar rekha
raj babbar rekha  sakal
Premier

स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर रेखासोबत रिलेशनशिपमध्ये होते राज बब्बर; 'या' कारणामुळे टिकलं नाही नातं, म्हणाले...

Payal Naik

Raj Babbar Relationship:अभिनेते राज बब्बर यांचा आज २३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच. सोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत राहिलं. त्यांनी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. त्यांचा नायक जितका गाजला तितकाच त्यांचा खलनायकही गाजला. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्यही अनेक चढउतारांनी भरलेलं होतं. राज यांनी नादिरा यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर त्यांचं अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर प्रेम जडलं. त्यांनी स्मिता यांच्याशी लग्नही केलं मात्र त्यांच्या मृत्यूनंतर राज हे अभिनेत्री रेखा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचं नातं टिकू शकलं नाही.

या नात्याने मदतच केली

राज हे स्मिता यांच्या आठवणीत व्याकुळ होते तर रेखा यादेखील एका मोठ्या रिलेशनशिपमधून बाहेर आल्या होत्या. ते दोघेही एकमेकांचे आधार बनले. एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. याबद्दल बोलताना राज म्हणालेले, 'आज रेखा हे नातं मान्य करत नसली तरी मला हे मान्य करायला काहीच अडचण नाही. या नात्याने मला नवा जन्म दिला आहे. या नात्याने मला मदतच केली आहे. भावनिक सपोर्टसाठी आम्ही एकमेकांना आधार दिला. मी रेखासोबत तशा प्रकारे रिलेशनमध्ये नव्हतो जसा स्मितासोबत होतो. मात्र आम्ही खूप चांगले मित्र झालो.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज यांना कुणीतरी रेखांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते रेखा यांच्यापासून अंतर राखून वागू लागले. सोबतच ते त्यांची पहिली पत्नी नादिरा हिच्याकडेही परत जाण्याचा विचार करू लागले. त्यावरून रेखा आणि राज यांच्यात भर रस्त्यात वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यातलं नातं संपलं ते कायमचं. रेखा यांनी कायमच या नात्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Meeting: भाजपचा तीव्र विरोध असूनही तो आमदार अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित; महायुतीत खडाजंगीची शक्यता!

Hathras Stampede: ट्रॉमा सेंटर जिथे ना ऑक्सिजन होता, ना जनरेटरमध्ये तेल; उपचारांशिवाय जखमींनी गमावला जीव

Dikshabhumi Case : दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून मोठी कारवाई; ...आरोपींच्या नावांची गुप्तता

David Miller: टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर मिलरनेही खरंच घेतली निवृत्ती? पोस्ट करत स्वत: केला खुलासा

Maharashtra Live News Updates : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला; पुढील 3 दिवसांत कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT