zee marathi awards 2024 esakal
Premier

'या' मालिकेने जिंकले सर्वाधिक पुरस्कार तर अक्षरा अधिपतीचा झाला हिरमोड, वाचा 'झी मराठी अवॉर्ड २०२४ 'च्या विजेत्यांची नावं

Zee Marathi Awards 2024 Winners List: २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी झी मराठीचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळेस कुणाला कुठला पुरस्कार मिळाला हे पाहूया.

Payal Naik

झी मराठी वाहिनी गेली २५ वर्ष सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेने अनेक उत्कृष्ट कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. या वर्षी वाहिनीला २५ वर्ष पूर्ण झाली. त्यासोबतच या वाहिनीवर सुरू झालेली पहिली मालिका 'आभाळमाया'ला देखील २५ वर्ष पूर्ण झाली. २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी झी मराठी अवॉर्ड २०२४ पार पडले. यात लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते श्रीरंग गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात एकाच अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट सासू आणि सुनेचा पुरस्कार पटकावला. तर 'शिवा' आणि 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकांना सगळ्यात जास्त पुरस्कार मिळालेत.

मात्र मॅटर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील अधिपतीला सर्वोत्कृष्ट मुलगा आणि भुवनेश्वरीला सवोत्कृष्ट खलनायिका हे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र यावेळेस या मालिकेला इतरांच्या तुलनेत खूप कमी पुरस्कार मिळाले आहेत. २०२३ मध्ये या मालिकेने सगळ्यात जास्त पुरस्कार जिंकले होते. आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील कलाकारांनाही पुरस्कार मिळालेले नाहीत. तर दुसरीकडे यावेळेस लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट अशा वेगवेगळ्या कॅटेगरी ठेवण्यात आल्या होत्या. वाचा कोणत्या व्यक्तिरेखेला कोणते पुरस्कार मिळालेत.

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – १ विजेते…

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – दुर्गा ( नवरी मिळे हिटलरला )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – प्रितम ( पारू )

सर्वोत्कृष्ट मैत्री – शिवा, पाना गँग ( शिवा )

सर्वोत्कृष्ट आजी – बाई आजी ( शिवा )

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अमोल, गनी, बनी, चिनू-मनू, बटर

सर्वोत्कृष्ट सासरे – रामभाऊ ( शिवा )

सर्वोत्कृष्ट जावई – ए.जे. ( नवरी मिळे हिटलरला )

झी मराठी रायझिंग स्टार – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )

सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू ( पारू )

सर्वोत्कृष्ट मुलगा – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा )

सर्वोत्कृष्ट सून – लीला ( नवरी मिळे हिटलरला )

सर्वोत्कृष्ट सासू – लीला ( नवरी मिळे हिटलरला )

विशेष लक्षवेधी चेहरा – लीला ( नवरी मिळे हिटलरला )

‘झी मराठी’ जीवनगौरव पुरस्कार – श्रीरंग गोडबोले

सर्वोत्कृष्ट शायनिंग पुरस्कार – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )

Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा पुरुष – आशू ( शिवा )

Zee 5 लोकप्रिय व्यक्तिरेखा स्त्री – पारू ( शिवा )

Zee 5 लोकप्रिय मालिका – शिवा

विशेष योगदान पुरस्कार – संदीप रसाळ

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळा भाग – २ विजेते…

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री – दामिनी ( पारू )

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष – चंदन ( शिवा )

सर्वोत्कृष्ट बाबा – आकाश ( पुन्हा कर्तव्य आहे )

सर्वोत्कृष्ट आई – अहिल्यादेवी ( पारू )

सर्वोत्कृष्ट बहीण – तेजश्री, धनश्री, भाग्यश्री, राजश्री ( लाखात एक आमचा दादा )

सर्वोत्कृष्ट दादा – सूर्या दादा ( लाखात एक आमचा दादा )

सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा )

सर्वोत्कृष्ट खलनायक – डॅडी ( लाखात एक आमचा दादा )

विशेष सन्मान – मालिका आभाळमाया

सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – एजे आणि लीला ( नवरी मिळे हिटलरला )

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय जोडी – अप्पी आणि अर्जुन ( अप्पी आमची कलेक्टर )

सर्वोत्कृष्ट नायिका – शिवा ( शिवा मालिका )

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायिका – अप्पी ( अप्पी आमची कलेक्टर )

सर्वोत्कृष्ट नायक – आदित्य ( पारू )

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नायक – एजे ( नवरी मिळे हिटलरला )

लोकप्रिय कुटुंब – एजे कुटुंब ( नवरी मिळे हिटलरला )

सर्वोत्कृष्ट कुटुंब – किर्लोस्कर कुटुंब ( पारू )

लोकप्रिय मालिका – नवरी मिळे हिटलरला

सर्वोत्कृष्ट मालिका – पारू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye-Poll: भाजपनं जाहीर केला नांदेड पोटनिवडणुकीचा उमेदवार; 'या' उमेदवाराला दिली संधी

प्रचारासाठी महायुतीचं ब्रम्हास्त्र! लाडक्या बहिणी उतरल्या मैदानात; कारण काय? पडद्याआड काय घडतंय?

Diwali Festival 2024 : भांडी,सोफा,डॉल.. ! दिवाळीमधली खास सोलापुरी बोम्मरिल्लू परंपरा माहिती आहे का ?

Agni Chopra ने ठोकले सलग दुसरे द्विशतक, सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला; टीम इंडियाचा Future Star!

Diwali Festival 2024 : दीपोत्सवाच्या मंगलपर्वाला आजपासून सुरवात; शहरातील लहानमोठ्या मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई

SCROLL FOR NEXT