Akshay Kumar Disha Patani And Tiger Shroff Celebrating Holi 2024. Esakal
Premier

Disha Patani: आला होळीचा सण लय भारी... टायगर, दिशाने उधळले अक्षयसोबत रंग

Holi Celebration By Bollywood: देशातील काही भागांत आज रंगपंचमी साजरी केली जात आहे. या सणाचा आनंद लुटण्यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

देशातील काही भागांत आज रंगपंचमी साजरी केली जात आहे. या सणाचा आनंद लुटण्यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत.

काही वेळापूर्वीची दिशा पाटणीने दिग्गज अभिनेता अक्षय कुमार आणि एक्स बॉयफ्रेंन्ड टायगर श्रॉफ यांच्यासोबत रंगपंचमी साजरी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिशाने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिदास मिळत आहे. (Akshay Kumar Disha Patani And Tiger Shroff Celebrating Holi 2024)

दिशाने हा व्हिडिओ शेअर करताना 'हॅप्पी होली' असे दोनच शब्दांचे कॅप्शन दिले आहे. यामध्ये दिसत आहे की, थाळीतून अक्षय आणि टायगर दिशाच्या अंगावर रंग फेकत आहेत.

दिशाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या एका तासात 3 लाख 95 हजार यूजर्सनी पाहिला आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'छोटे मियाँ बडे मियाँ'चे प्रमोशन करत आहेत.

दरम्यान अक्षय कुमारनेही रंगपंचमीनिमित्त रंग खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, अक्षय घरातून बाहेर पडताना टायगर त्याच्या अंगावर पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होत. पण टायगरचा हा प्रयत्न अक्षय हाणून पाडत आहे.

दुसरीकडे अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही रंगपंचमी खेळल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कियारा आणि सिद्धार्थ लाल आणि पिवळ्या रंगात माखलेले दिसत आहे. या पोस्टसोबत कियाराने "होली विथ माय होमी" असे, कॅप्शन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT