Bollywood Latest update: निर्माते वाशू भगनानी यांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या.
अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा तब्बल ३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. या चित्रपटाची रिलीजपूर्वी खूप चर्चा होती, पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करू शकला नाही. सिनेमा फ्लॉप झाल्याने भगनानी यांच्या पूजा एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या चित्रपटामुळे जे नुकसान झाले त्याचे २५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वाशू भगनानी यांनी मुंबईतील ऑफिस विकल्याची माहिती समोर आली आहे
आर्थिक तोट्यामुळे त्यांनी प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी कमी केले आहेत असे समजते आहे. मात्र अद्याप प्रॉडक्शन हाऊसने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे सर्व २०२१ मध्ये कोरोनाच्या साथीनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या हिंदी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बेलबॉटम’पासून सुरू झाले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘मिशन राणीगंज’ही सपशेल आपटला. टायगर श्रॉफचा बिग बजेट ‘गणपत’देखील फ्लॉप ठरला.
इतकंच नाही तर डील झाल्यावरही एका ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला, त्यामुळे या कर्जात भर पडत गेली. मग प्रॉडक्शन हाऊसने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये गुंतवणूक केली, हा चित्रपट हिट झाल्यास परिस्थिती सुधारेल अशी आशा भगनानी यांना होती, पण चित्रपट फ्लॉप झाला आणि प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.