Bigg Boss Marathi Season 5 with Akshay Kumar Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर लावणार खिलाडी कुमार हजेरी , प्रोमो झाला व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चा दुसरा आठवडा चांगलाच गाजला. दुसऱ्या आठवड्यात घरातील प्रेमप्रकरण, नवीन वाद आणि दुष्मनी पाहायला मिळतेय. यावर आज सदस्यांची हजेरी घ्यायला आज शनिवारी भाऊचा धक्का बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे.

पण आज भाऊच्या धक्क्यावर फक्त रितेशचा नाही तर बॉलिवूडमधील एक दिग्गज कलाकार पहिल्यांदाच हजेरी लावणार आहे. सोशल मीडियावर नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आणि लगेचच हा प्रोमो व्हायरल झाला.

अक्षयचीच हवा

आजच्या भाऊच्या धक्क्यावर अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याच्या आगामी खेल खेल में या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी तो भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अक्षयने मराठीत संवाद साधला आणि आज तो बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावणार असल्याचं सांगितलं. पहिल्यांदाच सिनेमाच्या प्रोमोशननिमित्ताने अक्षय कुमार बिग बॉस मराठीच्या मंचावर हजेरी लावणार आहे. या आधी सलमान व्यतिरिक्त कोणत्याही बॉलिवूड कलाकाराने बिग बॉस मराठीच्या मंचावर हजेरी लावली नव्हती. बिग बॉस मराठीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय.

हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच अनेकांनी कमेंट करत त्यांची उत्सुकता व्यक्त केली. तर पहिल्यांदाच बिग बॉस मराठीमध्ये बॉलिवूड कलाकार येत असल्याबद्दल अनेकांनी आनंदही व्यक्त केला.

या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश कुणाची शाळा घेणार आणि कुणाचं कौतुक करणार हे जाणून घेण्यासाठी सगळेचजण उत्सुक आहेत . सूरज चव्हाणची चर्चा सगळीकडे आहेच आणि रितेश त्याच कौतुक करणार का ? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

REIT Investment: फक्त 140 रुपयांमध्ये करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक करा; भाड्यातून होईल मोठी कमाई

SCROLL FOR NEXT