sarfira movie review  
Premier

Sarfira Twitter Review: हिट की फ्लॉप? 'सरफिरा' वाचवणार का अक्षय कुमारचं करिअर? पाहायला जाण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

Payal Naik

सुधा कोंगारा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा 'सरफिरा' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत परेश रावल, राधिका मदान यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ चित्रपट 'सुरराई पोटटू'चा रिमेक आहे. हा चित्रपट २०२० साठी आला होता. ज्यात दाक्षिणात्य अभिनेता सूर्या मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात वीर जगन्नाथ म्हात्रे यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ज्यांनी बजेट एअरलाइन तयार करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते पूर्णही केलं. आता 'सरफिरा'मध्ये अक्षयने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटलाय ते पाहूया.

अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट अक्षय कुमारचं डुबणारं करिअर सावरेल असं दिसतंय कारण प्रेक्षकांनी या चित्रपटाचं आणि अक्षयच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. अनेकांना चित्रपटाची कथा आवडली आहे तर अनेकांना चित्रपटाची मांडणी भावली आहे. एका ट्विटर युझरने लिहिलं, 'हा चित्रपट खूप छान बनवण्यात आला आहे. अशा चांगल्या चित्रपटाला पाठिंबा देण्याची गरज आहे. आणि अक्षय कुमारला अशाच दमदार चित्रपटाची गरज होती.'

आणखी एका युझरने लिहिलं, 'या सगळ्या ऍक्शन चित्रपटांच्या जगात सरफिरा एक आनंदाची झुळूक आहे. अक्षय कुमार परत आलाय. पाहण्यासारखा चित्रपट आहे. खूप छान अभिनय आणि परफॉर्मन्स.' आणखी एका युझरने लिहिलं, 'भाई तू तर सूर्याला देखील मागे टाकलंस. कसला भारी अभिनय केलायस तू. तू खऱ्या अर्थाने खिलाडी आहेस.

एका युझरने अक्षयच्या अभिनयाचं कौतुक केलंय तर एकाने त्याच्या भावनिक प्रसंगाचं. एकूणच चाहत्यांना अक्षयचा हा चित्रपट आवडला आहे. एक भलंमोठं स्वप्न सत्यात उतरवणारा हार न मानणारा अवलिया या चित्रपटात दिसतो आहे. हा चित्रपट कदाचित अक्षयच्या डुबणाऱ्या करिअरला खऱ्या अर्थाने पुन्हा सावरू शकेल अशी आशा आता व्यक्त केली जातेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT