sarfira movie review  sakal
Premier

अशक्यप्राय स्वप्नाची यशस्वी संघर्षकथा, अक्षय कुमारच्या मेहनतीचं फळ मिळणार? कसा आहे 'सरफिरा'

Santosh Bhingarde

खिलाडी कुमार अक्षयचे अलीकडच्या काळात बाॅक्स आॅफिसवर एकापाठोपाठ एक चित्रपट अपयशी ठरत होते. त्यामुळे अक्षय कुमारला कमबॅक करण्यासाठी एका यशस्वी चित्रपटाची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता ‘सरफिरा’ या चित्रपटाने पू्र्ण केली आहे, असेच म्हणावे लागेल. एक सर्वसामान्य माणूस आपले स्वप्न पू्र्ण करण्यासाठी कशा प्रकारे झगडतो... मोठ्या आत्मविश्वासाने येथील सिस्टीमशी संघर्ष करून जिद्दीने आपले लक्ष्य कसे पूर्ण करतो... ही प्रेरणादायी कथा या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे.

तमीळ सुपरस्टार सूर्याच्या ‘सूरराई पोत्रू’ चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. तमीळ चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलं आणि आता हिंदी चित्रपटाचंही दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह राधिका मदान, परेश रावल, सीमा बिस्वास, इरावती हर्षे, आर. सरतकुमार, सौरभ गोयल, अनिल चॅटर्जी आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

ही कथा आहे महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका सर्वसामान्य तरुणाची. वीर म्हात्रे असे त्या तरुणाचे नाव. तो एका शाळा मास्तरचा मुलगा असतो. लहानपणापासून त्याचे विचार क्रांतिकारी असतात. आपल्या समाजातील शोषित-वंचित वर्गासाठी काही तरी केले पाहिजे, ही त्याची तळमळ असते. त्याकरिता तो एअर फोर्समध्ये भरती होतो. त्याचदरम्यान त्याचे वडील गंभीर आजारी असल्याचे त्याला समजते. तो तेथून ताबडतोब आपल्या वडिलांना पाहण्यासाठी निघतो. लवकरात लवकर घरी पोहोचावे याकरिता तो विमानाने येण्याचा निर्णय घेतो.

विमानतळावर आल्यानंतर त्याच्या लक्षात येते की विमानाचे तिकीट खूप महागडे आहे. त्याच्याकडे असलेले पैसे आणि मित्रांनी निघताना उधार म्हणून दिलेले पैसे पुरेसे नसल्याचे त्याला समजते. साहजिकच तो विमानतळावरील प्रवाशांना विनवणी करतो. त्यांच्याकडे उधार पैसे मागतो; परंतु त्याला कुणीही पैसे देत नाहीत. तो हताश आणि निराश होतो. त्यातच तो वेळेवर न पोहोचल्यामुळे त्याच्या वडिलांचे निधन होते आणि तेथेच त्याच्या करिअरला वेगळी कलाटणी मिळते.

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा याकरिता काय करता येईल, याचा तो विचार करतो आणि आपला हा विचार तो सत्यात कसा उतरवितो... त्याकरिता त्याला त्याचे गावकरी आणि त्याची पत्नी व आई कशा प्रकारे सहकार्य करते, बिझनेसमन परेश गोस्वामी त्याच्या कामामध्ये कशा प्रकारे अडचणी आणि अडथळे आणतात, त्या अडथळ्यांवर वीर म्हात्रे कशा प्रकारे मात करतो, आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला विमान प्रवासाचा आनंद तो कसा देतो, ही प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

हा चित्रपट एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या आयुष्यातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांनी तमीळ चित्रपटातील तीच कथा नव्या शैलीमध्ये, नवीन कलाकारांना घेऊन आणि नवीन ढंगात मांडली आहे. समाजातील शोषित-वंचित वर्गाची होणारी हेळसांड, त्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी करावा लागणारा संघर्ष, येथील धनाढ्य आणि प्रस्थापितांविरुद्ध द्यावा लागणारा लढा वगैरे बाबी त्यांनी उत्तमरीत्या मांडलेल्या आहेत. अक्षय कुमारने वीर म्हात्रे; तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत राधिका मदनने उत्तम कामगिरी केली आहे. अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वपूर्ण चित्रपट आहे आणि त्याच्या बुडत्या जहाजाला तो वाचविणारा आहे.

त्याने वीर म्हात्रेच्या भूमिकेत कमालीचा अभिनय केला आहे. आशा-निराशा, असहायता आणि इच्छा-आकांक्षा असे विविध भाव त्याने पडद्यावर छान रेखाटले आहेत. विशेष म्हणजे राधिका मदन या चित्रपटात कमालीची भाव खाऊन गेली आहे. स्वाभिमानी, प्रामाणिक तसेच आपल्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ‘राणी’ या मराठी मुलीची भूमिका तिने बेमालूमपणे साकारली आहे. तिच्या भूमिकेला विविध शेडस्् आहेत आणि प्रत्येक फ्रेममध्ये तिने आपल्या अभिनयाची चमक-धमक दाखविली आहे.

मराठी भाषेचा लहेजा तिने छान पकडला आहे. त्याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. परेश रावलने बिझनेसमन परेश गोस्वामी ही व्यक्तिरेखा आपल्या अंदाजात साकारली आहे. अन्य कलाकारांनीदेखील आपापली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाचे संगीत छान जमलेले आहे. राधिका मदनचा गाण्यातील मराठी अंदाज छान आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. मात्र संकलनाच्या बाबतीत चित्रपट काहीसा कच्चा झालेला दिसत आहे. प्रेरणादायी आणि भावनाप्रधान असा हा चित्रपट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT