akshaya deodhar esakal
Premier

सुंदर डिझाइन अन् सुबक फर्निचर, आतून कसं आहे पाठकबाईंच्या 'भरजरी' साड्यांचं दुकान? पाहा Inside Photo

Payal Naik

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने पाठकबाई बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. राणादा आणि पाठकबाई हे दोघेही चाहत्यांचं लाडकं जोडपं आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने स्वतःचा साड्यांचा व्यवसाय सुरू केला. तिने भरजरी हे साड्यांचं नवं दालन सुरू केलं. ती आणि तिच्या मैत्रिणी मिळून हा व्यवसाय पाहतात. काही दिवसांपूर्वीच तिने पुण्यात हे दुकान सुरू केलं होतं, हे दुकान कसं दिसतं हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता अभिनेत्रीने आपल्या दुकानाचे फोटो शेअर केले आहेत.

अक्षयाने तिच्या दुकानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सुरुवातीला या दुकानाचा भलामोठा दरवाजा दिसतो. आत गेल्यावर भरजरीचं काउंटर दिसतं. या दुकानात ग्राहकांच्या बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण दुकानाचं फर्निचर हे लाकडाचं आहे. मध्ये पार्टीशन पाडण्यासाठी लाकडाच्या डिझाइन केलेल्या फळीचा वापर करण्यात आला आई. वर सुंदर झुंबर दिसत आहेत तर साड्या ठेवण्याचं ठिकाणही खूप आखीव रेखीव आहे. तिथं खास डिझाइन करण्यात आली आहे. फोकस लाइट्सचा भरपूर वापर करण्यात आला आहे. संपूर्ण दुकानात खाली लाल गालिचा आहे.

हे दुकान पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षयाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती 'तुझ्यात जीव रंगला; नंतर कुठेही दिसली नाही. तिने एक शो होस्ट केला होता मात्र त्यानंतर तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलेलं नाही. चाहते तिच्या परत येण्याचीही वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

Nashik Cyber Fraud : इडीकडून अटकेची भिती दाखवून 90 लाखांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT