alyad palyad  sakal
Premier

Alyad Palyad Movie Reveiw: कोकणातील गावाची थरारक कथा; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारा 'अल्याड पल्याड'

Alyad Palyad Review: कसा आहे गौरव मोरे आणि मकरंद देशपांडे यांचा अल्याड पल्याड?

संतोष भिंगार्डे

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनत असले तरी हाॅरर-काॅमेडी चित्रपटांची संख्या तशी अत्यल्प आहे. दिग्दर्शक विशाल फुरियाचा 'लपाछपी' हा चित्रपट सन २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्याचबरोबर 'झोंबिवली', 'व्हिक्टोरिया' असे काही रहस्यमय तसेच हाॅरर चित्रपट प्रदर्शित झाले. आता दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील आणि निर्माते महेश निंबाळकर व शैलेश जैन यांचा 'अल्याड पल्याड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा एक भयपट आहे आणि तो आपल्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा असाच झाला आहे.

ही कथा आहे कोकणातील एका गावातील. या गावातील मंडळी तीन दिवस गावाजवळच असलेल्या नदीच्या पलीकडे राहायला जात असतात. त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेली ती एक प्रथा असते. गावकऱ्यांच्या प्रथेप्रमाणे या तीन दिवसामध्ये गावामध्ये भुते येत असतात. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्ती तेथे राहात नसते. कारण राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. त्या प्रथेप्रमाणे गावातील सरपंच देवाची पूजा अर्चा करून नदीच्या पलीकडे राहायला येतात. त्याच दरम्यान गावातीलच शहरामध्ये शिकायला गेलेला एक मुलगा पंक्या (भाग्यम जैन) आपल्या दोन मित्रांना चतुर (गौरव मोरे) आणि किश्या (सक्षम कुलकर्णी) यांना घेऊन गावामध्ये येतो.

कुणीही गावकरी गावामध्ये नसताना आपल्या गावात काय चालले असेल याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते. त्यातच चतुरला या गावातील घडामोडी आपल्या कॅमेऱ्यात टिपायच्या असतात. कारण गावामध्ये भुते वगैरे येतात या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. त्यामुळे अख्खे गाव नदीपलीकडे आलेले असते आणि हे तिघे मित्र दिल्याच्या (संदीप पाठक) होडीने गावात आलेले असतात. त्यांच्या होडीमध्ये सरपंचाची मुलगी निधी (अनुष्का पिंपुटकर) लपूनछपून आलेली असते. मग पंक्या, चतुर, किश्या, दिल्या आणि निधी आल्यानंतर त्या ओसाड गावामध्ये नेमके काय घडते...गावकरी पंक्या, चतुर, किश्या, दिल्या आणि निधी यांना शोधायला गावकरी येतात की नाही...या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील.

दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांची ही कथा आहे आणि संजय नवगिरे यांनी या पटकथा व संवाद लिहिलेले आहेत. खरे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक दंतकथा आहेत. अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. त्यातीलच एका दंतकथेवर बेतलेला हा चित्रपट आहे. या कथेल उत्तम ट्रिटमेंट देण्याचे काम पटकथा आणि संवाद लेखकाने केले आहे. मकरंद देशपांडे हा एक अवलिया कलाकार आहे. भूमिका कोणतीही असली तरी ती उत्तमरीत्या वठविण्याची त्याची खासियत आहे. या चित्रपटातील सिद्धयोगी साधूची भूमिका त्याने आपल्या शैलीमध्ये साकारली आहे.

त्याचबरोबर सक्षम कुलकर्णी, गौरव मोरे. भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर, संदीप पाठक, चिन्मय उद््गीरकर आदी कलाकारांनीदेखील आपापल्या भूमिका यथोचित साकारल्या आहेत. घाबरट आणि सतत भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या किश्याच्या भूमिकेतील सक्षम कुलकर्णी आणि दिल्याच्या भूमिकेतील संदीप पाठक यांनी उत्तम अभिनय केला आहे. माधुरी पवारवर चित्रित झालेले गाणे या चित्रपटाचा एक प्लस पाॅइंट आहे.

सिनेमॅटोग्राफर योगेश कोळीने कोकणातील काही सुंदर दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत. व्हीएफएक्स तंत्राचा वापर उत्तम करण्यात आला आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत दमदार झाले आहे. त्याचे श्रेय पार्श्वसंगीतकार अभिनय जगताप यांना द्यावे लागेल. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध संथ झाला आहे. त्यामुळे निराशा पदरी येते. मात्र उत्तरार्धात चित्रपट चांगली पकड घेतो आणि गुंतवून ठेवतो. हा चित्रपट म्हणजे गुंतवून ठेवणारा भयपट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT