amey wagh  sakal
Premier

Amey Wagh: अमेय वाघने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ठरला असं काही करणारा पहिलाच मराठी कलाकार

Payal Naik

सोशल मिडीयाच्या युगात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयीच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात. कलाकारांच्या सोशल मिडिया पोस्टवरून त्यांच्या अपडेट्स आणि त्यांचं खासगी आयुष्य देखील जगासमोर असतं. शिवाय कलाकारांच्या लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. यातच सध्या व्हॉट्सअॅप चॅनेलचा देखील ट्रेंड मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतोय. अनेक कलाकारांनी त्यांचे व्हॉट्सअॅप चॅनेल देखील सुरु केले आहेत. या चॅनेलवरुन त्यांना चाहत्यांसोबत कनेक्ट होता येतं आणि त्यांच्या अपडेट्स शेयर करता येतात.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ देखील आता त्याच्या चाहत्यांशी आणखी जवळून कनेक्ट होणार आहे. अमेयने त्याच्या चाहत्यांशी दिल से कनेक्ट होण्यासाठी त्याचं स्वत:चे व्हॉट्सअॅप चॅनेल सुरु केले आहे. स्वत:चे व्हॉट्सअॅप चॅनेल सुरु करणारा अमेय वाघ हा पहिलाच मराठी अभिनेता आहे. या चॅनेलच्या माध्यमातून अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स विषयीच्या अपडेट्स आणि त्याच्या चित्रपटांविषयी आणखी माहिती ही एका क्लिकवर घेता येईल. अमेयने सोशल मिडीयावरुन नुकतीच या विषयीची माहिती त्याच्या चाहत्यांना दिलीय. अमेयचं डिजीटल युगातील हे नवं पाऊल त्याला त्याच्या चाहत्यांच्या आणखी जवळ घेऊन जाईल असं चित्र दिसतय.

amey wagh

'काला पानी', 'असूर' यांसारख्या हिंदी वेबसीरिज, 'दिल दोस्ती दुनियादारी' सारखी लोकप्रिय मालिका आणि 'फास्टर फेणे', 'मुरांबा', 'धुरळा' यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विविध कार्यक्रमांमध्ये देखील सुत्रसंचालनाची जबाबदारी अमेयने पार पाडलीय. नाटक, मालिका, चित्रपट, ओटीटी अशा विविध माध्यमांमध्ये अमेयने त्याच्या अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केलीय. मराठीसह हिंदीतही त्याने त्याच्या कामातून नावलौकिक केलय. आगामी काळातही तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

अमेयने त्याच्या व्हॉट्सअॅप चॅनेलचे सरप्राईज तर चाहत्यांना दिलेच मात्र काही दिवासांपूर्वी आणखी एका गोष्टीविषयी सोशल मिडीयाच्या माध्मयातून सांगितले. ती गोष्ट म्हणजे अमेयची आगामी वेब सिरीज. 'एजंट विनोद' या आगामी वेब सिरीजमध्ये अमेय वाघ झळकणार आहे. या वेब सिरीजचे पोस्टर आणि टीझर अमेयने नुकतेच शेयर केले आहे. त्यामुळे अमेयच्या या वेब सिरीजची देखील चाहत्यांना उत्सुकता होती. अमेयची ही नवी वेब सिरीज देखील भाडीपा युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

SCROLL FOR NEXT