amitabh bachchan  esakal
Premier

सावत्र आईबद्दल पहिल्यांदाच बोलले अमिताभ बच्चन; लग्नाच्या काही वर्षात झालेलं निधन, म्हणाले- त्यांच्या मृत्यूनंतर बाबूजी...

Amitabh Bachchan Talked About His StepMother: अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये खुलासा केला की त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं.

Payal Naik

बॉलिवूडचे महानायक म्हणवले जाणारे अमिताभ बच्चन हे लोकप्रिय कवी हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र आहेत. हरिवंश राय यांनी साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. आजही बिग बी ठिकठिकाणी त्यांच्या कविता ऐकवताना दिसतात. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराचसा काळ त्यांच्या आई-वडिलांसोबत घालवला आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से ते आजही प्रेक्षकांना सांगताना दिसतात. 'कौन बनेगा करोडपती सीझन 16' मध्ये अमिताभ यांनी त्यांच्या आईवडिलांशी संबंधित अशीच एक गोष्ट सांगितली आहेत. जी ऐकून चाहते चकीत झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांची आई तेजी बच्चन यांच्या आधी आणखी एक लग्न केलं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव श्यामा बच्चन होतं. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. श्यामा यांना टीबी झाला होता असं सांगण्यात येतं आणि त्यांचं निधन झाल्यावर हरिवंशराय बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला होता.

कोण होती हरिवंशराय बच्चन यांची पहिली पत्नी?

'कौन बनेगा करोडपती 16'मध्ये अमिताभ बच्चन म्हणाले, 'माझ्या वडिलांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ते खूप निराश झाले होते आणि त्यांनी लिहिलेल्या सर्व कविता त्या वेळी दुःखाने भरलेल्या होत्या.

कसा झाला हरिवंशराय बच्चन यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू?

हरिवंश राय यांनी 1926 मध्ये श्यामा यांच्याशी लग्न केलं होतं. क्षयरोगाच्या दीर्घ आजारानंतर 1936 मध्ये त्यांचं निधन झालं. यानंतर त्यांनी 1941 मध्ये तेजी सूरीशी लग्न केलं. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आई आणि वडिलांच्या भेटीबद्दलही सांगितलं की, 'बरेलीमध्ये त्यांचा एक मित्र होता आणि त्यांना भेटण्यासाठी गेले होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांना एक कविता ऐकवण्याची विनंती करण्यात आली. पण माझे वडील गाणं गाण्यापूर्वीच त्यांच्या मित्राने त्यांच्या पत्नीला तेजीला बोलवायला सांगितलं आणि इथेच त्यांची पहिली भेट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT