'कल्की 2898 एडी'मध्ये बिग बी 'अश्वत्थामा' च्या भूमिकेत; लूकनं वेधलं साऱ्यांचे लक्ष
Kalki 2898 AD esakal
Premier

Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी'मध्ये बिग बी 'अश्वत्थामा' च्या भूमिकेत; लूकनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

priyanka kulkarni

Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील कलाकारांचे लूक रिव्हिल करण्यात येत आहेत. नुकताच 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात 'अश्वत्थामा' (Ashwatthama) या भूमिका दिसणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला फोटो

अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील त्यांच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "असा अनुभव मला या आधी कधीच आला नाही.. अशा प्रोडक्टचा विचार करण्याची मानसिकता, आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक सुपरस्टार लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली."

अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा एक टीझरही शेअर केला आहे. यामध्ये ते अश्वथामाच्या लूकमध्ये दिसले. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

टीझरमध्ये दिसते की, अमिताभ बच्चन यांच्या अंगावर पांढरे कापड बांधलेले आहे. फक्त त्याचे डोळे दिसत आहेत आणि ते शिवलिंगाची पूजा करत आहेत. तेवढ्यात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, 'हाय...मी राया आहे. 'यानंतर तो मुलगा अश्वथामासोबत बोलू लागतो.

'कल्की 2898 एडी' ची रिलीज डेट

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात  प्रभास (Prabhas), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे साचले पाणी; 'या' स्थानकांवरील लोकलसेवा विस्कळीत

Sakal Podcast : राज्यात 'या' जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा ते सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा

Nashik Civil Hospital : सिव्हिलच्या शवागारावरून ‘तु-तु... मै..मै’; शितपेट्या निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 8 जुलै 2024

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जुलै 2024

SCROLL FOR NEXT