Premier

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; पाच वर्षांनी करणार मोठ्या स्क्रिनवर कमबॅक

priyanka kulkarni

Jolly LLB 3: जॉली एलएलबीया चित्रपटाच्या दोन्ही पार्ट्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर हे करत आहेत. तसेच या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) हे दोघे महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. आता या चित्रपट एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

'जॉली एलएलबी 3'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, जॉली एलएलबी-3 या चित्रपटामध्ये अभिनेत्री अमृता रावची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात राजस्थानमध्ये सुरू झाले आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतानं त्या शूटिंग शेड्यूलमध्ये सहभाग घेतला होता.

अमृता ही ठाकरे या 2019 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता ती जॉली एलएलबी-3 या चित्रपटातून मोठ्या पडद्यावरुन कमबॅक करत आहे.

राजस्थाननंतर मुंबई आणि दिल्लीत होणार शूटिंग

राजस्थानमध्ये होत असलेल्या जॉली एलएलबी-3 या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एका सूत्राने माहिती दिली की, 'या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे. ते ठिकाण असे होते की, त्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ शकत नसल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रत्येकाला चालत जावे लागत होते. आता चित्रपटाचे शूटिंग मुंबईत होत आहे. यानंतर काही सीन दिल्लीत शूट होणार आहेत.

जॉली एलएलबी या चित्रपटाचा पहिला भाग 2013 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर जॉली एलएलबी-2 हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला. आता प्रेक्षक जॉली एलएलबी-3 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Prasar Bharati: प्रसार भारती सुरू करणार स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म; स्ट्रीमिंग ॲप्स चिंतेत, काय आहे कारण?

Ajit Pawar NCP: अजित पवारांचं ठरलं? लढणार तर 'एवढ्या' जागांवर; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय

Jahnavi Killedar: 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी; अनेक वस्तू लंपास, धसक्याने आईला अर्धांगवायूचा झटका

Maharashtra Live News Updates : हाथरस दुर्घटनेतील मृतांची संख्या 121 वर

SCROLL FOR NEXT