radhika merchant  sakal
Premier

Anant Radhika Wedding: ९० झेंडू, हजारहुन जास्त मोगऱ्याच्या कळ्या, राधिकाच्या हळदी लूकच्या ओढणीची किंमत ठाऊक आहे?

Radhika Merchant Haldi Look Price: हळदीसाठी राधिकाने निवडलेल्या ओढणीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अजूनही सोशल मीडियावर या ओढणीची चर्चा आहे.

Payal Naik

Radhika Merchant Haldi Dupatta: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचं लग्न आता एका दिवसावर येऊन ठेपलं आहे. अनंत अंबानी हा १२ जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नातील अंबानींचे कपडे हा एक चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. मेहंदी, पूजा, गरबा नाईट असे अनेक कार्यक्रम पार पडले. या सगळ्याच कार्यक्रमातील नवरीचे लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र नेटकऱ्यांची सगळ्यात जास्त वाहवा मिळवणारा लूक ठरला राधिकाचा हळदी लूक. राधिकाने हळदीसाठी खास लूक केला होता. हा ड्रेस खास फुलापासून बनवण्यात आला होता. राधिकाच्या त्या फ्लोरल ओढणीची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का?

राधिकाने तिच्या हळदीसाठी पिवळ्या रंगाचा लेहेंगा निवडला होता. त्यावर तिने एक खास ओढणी घेतली होती. ही ओढणी पांढऱ्या रंगाच्या मोगऱ्याच्या कळ्यांनी बनवण्यात आली होती. तर त्याला झेंडूची फुलं लावण्यात आली होती. ही खरी फुलं होती. ही ओढणी फ्लोरल आर्ट डिजाइन स्टूडियो यांनी तयार केली होती. यात १ हजारहून अधिक सफेद कळ्या आणि ९० पिवळ्या रंगाचे झेंडू होते. एका रात्रीत ही ओढणी तयार केली गेली. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, तिच्या फुलांच्या दागिन्यासह या ओढणीची किंमत सर्वसाधारणपणे ४० ते ५० हजार रुपये आहे. तिच्या ओढणीची किंमत ३० हजार आहे.

राधिकाची ओढणी ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. आता अनेक नववधू तिच्याप्रमाणे आपल्या हळदीत फुलांचा वापर करत हा ट्रेंड फॉलो करताना नाही दिसल्या तरच नवल. राधिका आणि अनंत १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. तर हा सोहळा १४ जुलैपर्यंत चालणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT