abasaheb  esakal
Premier

कर्मयोगी आबासाहेब'मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व; 'हा' मराठी अभिनेता साकारणार गणपतराव देशमुख यांची भूमिका

Payal Naik

वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. स्वर्गीय मा .गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला "कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट २५ ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभर रिलीज होत आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटात अनिकेत विश्वासराव स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख ह्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

abasaheb

आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं. तब्बल अकरा वेळा ते आमदार झाले. त्यात दोनवेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे. त्यामुळे आबासाहेबांना चित्रपटातून पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता २५ ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Classical Language: मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Chakan MIDC: चाकणमधील 50 कंपन्या खरंच स्थलांतरित झाल्यात का? औद्योगिक विकास महामंडळाने केला खुलासा

Pune Crime : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून पित्याला अटक

Narendra Modi ५ ऑक्टोबरला ठाणे दौऱ्यावर, वाहतुकीत मोठे बदल, महत्त्वाचे रस्ते बंद, 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SSC Exam : दहावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT