Premier

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

priyanka kulkarni

Anjali Arora: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या रामायण (Ramayan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. साई पल्लवी ही या चित्रपटात सीता मातेची भूमिका साकारणार आहे. अशातच आता अभिषेक सिंग दिग्दर्शित श्री रामायण कथा (Shri Ramayan Katha) हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सीता मातेची भूमिका अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) साकारणार आहे. याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत अंजलीनं सांगितलं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अंजलीने सीते मातेची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सीतेची भूमिका साकारण्याची तयारीसाठी काही व्हिडिओ पाहिले आणि कार्यशाळेत भाग घेता, असं अंजलीनं मुलाखतीत सांगितलं.

साई पल्लवीबद्दल काय म्हमाली अंजली?

अभिषेक सिंग यांचा श्री रामायण कथा हा चित्रपट आणि नितेश तिवारी यांचा चित्रपट हा रामायणाच्या कथेवर आधारित आहे. अंजली अरोरा यांनी कबूल केले की, तिच्या अभिनयाची तुलना साई पल्लवीने रामायण चित्रपटात साकारलेल्या भूमिकेशी केली जाईल. याबद्दल तिनं मुलाखतीत सांगितलं, “माझी तुलना बॉलिवूड अभिनेत्रीशी झाली तर मला आनंद होईल.”

सोशल मीडियामुळे अंजलीला मिळाली प्रसिद्धी

अंजली अरोराचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कच्चा बदाम या गाण्यावरील अंजलीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला. अंजली सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या विविध लूक्समधील फोटो आणि डान्सचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 13 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT