Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट, फोटोशूट्स कायमच गाजतात. आज २१ जुलैला गुरुपौर्णिमा आहे यानिमित्ताने अंकिताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली.
अंकिताने आज गुरुपौर्णिमेला तिच्या आईबरोबरच फोटो शेअर करत एक खास पोस्ट आईसाठी शेअर केली. या पोस्टमध्ये ती म्हणते,"आई ही खूप स्पेशल फिलिंग आहे. जेव्हा कधी मला माझं आयुष्य खूप अवघड वाटतं त्यावेळी मला कायम तू माझ्या आनंदासाठी केलेल्या त्यागाची आणि सामोऱ्या गेलेल्या आव्हानांची आठवण मला येते. तू मला जे काही मार्गदर्शन केलंस त्यामुळे मी कायमच खंबीर बनत गेले. या गुरुपौर्णिमेला तुला देण्यासाठी फक्त माझ्याकडे प्रेम आहे. तू माझी पहिली गुरु आहेस जिने मला घडवलं. मी खूप कृतज्ञ आहे कि मला एक उत्तम आई आणि गुरु एकाचवेळी भेटले. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. "
सोशल मीडियावर अंकिताची ही पोस्ट चर्चेत असून अनेकांनी कमेंट करत तिच्या कृतीचं कौतुक केलं. अंकिताचे तिच्या आईशी घनिष्ट संबंध असून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरमध्ये तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. अंकिता मुंबईत स्ट्रगल करण्यासाठी आली तेव्हा तिच्या आईने तिला साथ दिली. अंकिता बऱ्याचदा आईसाठीही पोस्ट शेअर करत असते.
अंकिता आणि तिचा नवरा विकी जैन बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाले होते. अंकिता या शोची तिसरी रनर अप ठरली तर विकी जैन आधीच शो बाहेर गेला होता. त्या दोघांची बिग बॉसमधील भांडणं खूप गाजली होती. तर अंकिताच्या सासूने तिच्या केलेल्या अपमानामुळे सगळ्यांना धक्का बसला होता. अंकिता आता लवकरच आम्रपाली या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आधी तिने वीर सावरकर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.