Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिचा मुलगा अकायच्या जन्मानंतर बऱ्याच महिन्यांनी अखेर भारतात परतली आहे. 15 फेब्रुवारीला अकायचा लंडनमध्ये जन्म झाला. कुटूंबाला वेळ देण्यासाठी विराटने क्रिकेटमधून ब्रेक घेत काही काळ लंडनमध्ये घालवला. आयपीएलसाठी विराट एकटाच भारतात परतला तर अनुष्का काही काळ लंडनमध्ये थांबी होती. पण अखेर अनुष्का बऱ्याच काळाने लंडनहून दोन्ही मुलांसह भारतात परतली.
गेल्या काही दिवसांपासून अनुष्का परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनुष्का काल भारतात आल्यावर पापाराझींनी तिची भेट घेतली. विरल भयानीने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अनुष्काने पापाराझींशी संवाद साधल्याचा आणि अकायची झलक दाखविल्याचा दावा करण्यात आला आहे.
विरल भयानीने पोस्टमध्ये म्हंटलं आहे कि,"अनुष्का शर्माने एअरपोर्टवर पापाराझींना बाळाचा चेहरा दाखवला आणि लवकरच ती भेटेल असं वचन दिलं. मुलं नसताना ती नक्कीच फोटोसाठी पोझ करेल असं तिने सांगितलं. " याशिवाय अनुष्का लवकरच सर्वांसाठी पार्टीचं आयोजन करणार असल्याचीही चर्चा आहे. या आधीही अनुष्का आणि विराटने त्यांची मुलगी वामिकाचे फोटोज कुणी काढू नयेत अशी विनंती केली होती आणि अकायच्या जन्मानंतरही त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवल्याचं दिसून येतंय.
अनेक वर्षं डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराटने २०१७ साली लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटोज अजूनही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. २०२१ला अनुष्का आणि विराटची मुलगी वामिकाचा जन्म झाला तर १५ फेब्रुवारी २०२४ला अकायचा जन्म झाल्याची घोषणा त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमधून केली होती. एका ऍड शूटदरम्यान अनुष्का आणि विराटची भेट झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडले. त्यांचं रिलेशनशिप बराच काळ चर्चेत होतं.
क्रिकेटविश्वातील हे लाडकं कपल यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये एकत्र दिसलं नाहीये. त्यामुळे आगामी मॅचेसमध्ये अनुष्का विराटला चिअर करण्यासाठी उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.