apurva nemlekar esakal
Premier

हाकेच्या अंतरावर घर होतं पण मी.. भावाच्या निधनादिवशी जे घडलं त्याचा अपूर्वा नेमळेकरला आजही होतो पश्चात्ताप

Payal Naik

मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. कॉर्पोरेटमध्ये काम करणारी अपूर्वा आज एक यशस्वी अभिनेत्री बनली. तिने अनेक मालिका, नाटक आणि आता चित्रपटातही आपल्या भूमिकांची छाप पाडली. मात्र अपूर्वाने वैयक्तिक आयुष्यात खूप काही सोसलं आहे. आपल्या वडिलांना तिने डोळ्यांदेखत प्राण सोडताना पाहिलंय. त्याक्षणी काय करावं हेदेखील तिला सुचेनासं झालं होतं. हे कमी की काय म्हणून देवाने तिची आणखी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि तिच्या छोट्या भावालादेखील तिच्यापासून हिरावून घेतलं. मात्र त्याच्या निधनाच्या दिवशी अपूर्वाने एक मोठी चूक केली जी आजतागायत तिच्या लक्षात आहे.

अपूर्वाने नुकतीच राजश्री मराठीच्या तिची गोष्ट या सीरिजला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलता अपूर्वा म्हणाली, 'माझ्या आयुष्यातील वाईट गोष्ट किंवा ती चूक मला पुन्हा घडू द्यायची नाही ती म्हणजे माझ्या 'रावरंभा' चित्रपटाचं म्युझिक लाँच होतं दादरला स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाच्या इथे. मी तिथे सकाळी पोहचले होते. काहीही खाल्लेलं नव्हतं. दिवसभर तशीच होते. अनेक मुलाखती वगरे झाल्या. संध्याकाळ झाली. मी विचार केला बाजूलाच भावाचं घर आहे तिथे जाते त्याच्यासोबत डिनर कारेन मग रात्री आरामात निघेन ठाण्याला जायला. रात्री गाड्या पण नसतील फार. पण मला खूप भूक लागलेली.'

अपूर्वा पुढे म्हणाली, 'मी तिथेच काहीतरी खाल्लं. मग विचार केला आता काही मला डिनर जाणार नाही. मी घरी जाते. उद्या तसाही माझा भाऊ घरी येणारच आहे ठाण्याला. असा विचार करून मी ठाण्याला यायला निघाले. दादरला गेल्यामुळे माझ्या सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी गाडीतच प्रचंड रडत रडत घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की माझा २८ वर्षाचा भाऊ कार्डियाक अरेस्टने गेला.'

ती पुढे म्हणाली, 'मला कळेच ना काय झालंय. मग मला जाणीव झाली की काल जर मी तिथे दादरला त्याच्या घरी गेले असते तर कदाचित मला त्याला शेवटचं भेटता तरी आलं असतं. तो शेवटचा जिवंत दिसला असता. तेवढाच वेळ घालवता आला असता. मला वाटतं तेव्हा मी आठवणींमुळे रडत नव्हते तर माझी आत्मा रडत होती. तिला कळलं होतं कदाचित की अपूर्वा तू भावाला शेवटचं भेटण्याची संधीही गमावतेयस.' अपूर्वाच्या भावाचं १५ एप्रिल २०२३ रोजी निधन झालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT