Rakshabandhan 2024 : आज सगळीकडे उत्साहात रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे प्रत्येक बहिण तिच्या लाडक्या भावाला हातावर राखी बांधून त्याच्याकडून प्रेमाचं आणि तिचं रक्षण करण्याचं वचन मागणार आहे पण यंदाचे रक्षाबंधन काहीसं दुःखद दही आहे काही दिवसांपूर्वी कोलकत्ता मध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या प्रकरणावर व्यक्त झाली आणि आता अभिनेता अर्जुन कपूरनेही याबाबत महत्वपूर्ण भाष्य केलं
अर्जुन त्याच्या तीनही बहिणींबरोबर आज रक्षाबंधनाचा सण साजरा करणारे या पार्श्वभूमीवर बोलताना त्याने आपल्या बहिणींविषयी वाटणारी काळजी आपल्या देशातील प्रत्येक स्त्रियांसाठी त्याला वाटणारी काळजी आणि स्त्रियांच्या सुरक्षितेबाबत त्याचं असलेलं मत व्यक्त केलं
तो म्हणाला, " मी आता माझ्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करणार आहे. पण सध्या देशात जे काही सुरू आहे ते बघताना रक्षाबंधन सारखा सण साजरा करणं मला थोडंसं विचित्र वाटतं. रक्षाबंधनचा सण आपण एकमेकांचे रक्षण करावं हे वचन देण्यासाठी साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या बहिणीला तिची रक्षा करण्याचं तुमच्या आयुष्यातील स्त्रीला तिचे रक्षण करण्याचं वचन देता देशातील पुरुषांमध्ये काही गोष्टींची सामान्य जाणीव नसतानाही पण भावाने बहिणीचं रक्षण करावं याबद्दल बोलतो."
"कायम भावाने बहिणींच्या सोबत राहून त्यांची काळजी घेण्यापेक्षा आपण आपल्या बहिणींसाठी एक सुरक्षित वातावरण का तयार करू शकत नाही. जिथे त्या कोणत्याही भावाच्या मदतीशिवाय सुरक्षित फिरू शकतील कायमच भावाने बहिणीचे संरक्षण केलं पाहिजे असं म्हटलं जातं आणि आपल्याला तसंच वातावरणही पाहायला मिळतं. भाऊ त्याच्या बहिणी बाबत किंवा पुरुष स्त्रियांबाबत कायमच त्यांचं संरक्षण करत असल्यासारखे वावरतात. पण आपण इतर पुरुषांना हे का शिकवू शकत नाही की स्त्रियांचा संरक्षण करण्यापेक्षा त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्याची जास्त गरज आहे." असं पुढे तो म्हणाला
"मला आशा आहे की, जरी फार कमी लोकांना या गोष्टीची जाणीव झाली असली तरी आता यावर बोलायला सुरुवात झाली आहे. एक भाऊ म्हणून एक माणूस म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातील स्त्रियांना कसं वागवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की पुरुषांना त्यांच्या आसपासच्या स्त्रियांना सुरक्षित कसं वाटेल हे वागवण्याची पद्धत शिकवली पाहिजे. फक्त त्यांचं संरक्षण करणं शिकवण गरजेच नाहीये मला वाटतं की हा एक मोठा धडा असेल. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना सुरक्षित असल्याची जाणीव करून देऊ फक्त त्यांचे संरक्षण नाही तर त्यांच्या आसपास त्यांना आधार देण्यासाठी उभे राहू. मला आशा आहे की अनेक पुरुष त्यांच्या आसपासच्या स्त्रियांना फक्त सुरक्षित असल्याची जाणीव करून देणार नाहीत तर त्यांच्या आयुष्यात त्यांचा आधार बनून त्यांना अजून ताकदवान आणि खंबीर उभे राहण्यास मदत करतील." अस म्हणून त्याने पुरुषांना महत्त्वाचा संदेश दिला.
सोशल मीडियावर अर्जुनचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे अनेकांनी कमेंट करत अर्जुनच्या या कृतीच कौतुक केलंय अर्जुन नी सांगितलेली गोष्ट महत्त्वाची आहे असं अनेकांनी म्हटलं. अर्जुन आता सिंघम अगेन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी ने केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.