atul parchure cremetion  esakal
Premier

एका हास्यपर्वाचा अंत! अतुल परचुरे अनंतात विलीन; लाडक्या मित्राला निरोप देताना संजय मोनेंना अश्रू अनावर

Payal Naik

सिनेसृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता आज अनंतात विलीन झाला. अभिनेते अतुल परचुरे याची अकाली एक्झिट ही सगळ्यांच्याच जीवाला चटका लावून जाणारी होती. अतुल गेली दोन वर्ष कर्करोगासारख्या मोठ्या आजाराचा सामना करत होते. त्यातून ते बरेही झाले होते मात्र पुन्हा एकदा या आजाराने डोकं वर काढलं आणि त्यातच त्यांचं निधन झालं. अतुल यांचं १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झालं. त्यानंतर आज १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दादर येथील घरी ठेवण्यात आला होता. अनेक कलाकारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेर अतुल आज अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

atul parchure cremation

अतुल यांनी बालपणापासूनच मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानंतर त्यांना त्यांच्या आजाराबद्दल कळलं आणि तेव्हापासून त्यांचा एक अवघड प्रवास सुरू झाला. त्यांनी त्यांच्या आजारावर मात केली होती मात्र शेवटी ते ही लढाई हरले. त्यांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या लाडक्या मित्राला शेवटचं पाहण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी गर्दी केली होती. आपल्या मित्राला शेवटचं पाहण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील हजर होत्या. तर या प्रसंगी संजय मोने यांना अश्रू अनावर झाले होते.

त्यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, श्रेयस तळपदे, तुषार दळवी, राहुल मेहेंदळे, प्रियदर्शन जाधव, नेहा पेंडसे, अरुण कदम, निवेदिता सराफ, सुचित्रा बांदेकर यांसोबतच इतर कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. एका हरहुन्नरी अभिनेत्याने अखेर या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: “आता तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

Election Commission Press Conference LIVE : लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली - देवेंद्र फडणवीस

Alia Bhatt : "रणबीर भट्ट आणि आलिया कपूर" ; राहाने बदलली आई-बाबांची नावं

IND vs NZ: टीम इंडियाची प्लेइंग-११ पहिल्या कसोटीसाठी कशी असणार? रोहित सांगितला प्लॅन

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT