atul parchure  esakal
Premier

लग्नाचा २५ वा वाढदिवस; कर्करोगाबद्दल कळलं पण 'ती' चूक जीवावर बेतली, अतुल यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे म्हणजे सिनेसृष्टीतील गाजलेलं नाव. त्यांनी अनेक नाटकं, सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. मात्र आज १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अतुल आयुष्याची लढाई हरले. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कर्करोग झाला होता. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र जेव्हा त्यांना या आजाराचं निदान झालं तेव्हा त्यांच्यावर चुकीचे उपचार झाले होते. एक चूक आणि सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट कलाकार गमावला. तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे स्वतः अतुल यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.

एका मुलाखतीत अतुल यांनी सांगितलं, 'माझ्या लग्नाला २५ वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया-न्युझिलंडला फिरायला गेलो होतो. पण, तिकडून आल्यानंतर काही दिवसांनंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने मला काही औषधं सुद्धा दिली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भिती दिसत होती. मला तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये ५ सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा एकच प्रश्न विचारला. डॉक्टरांनी हो. तू ठीक होशील असं उत्तर दिलं.'

ते पुढे म्हणालेले, 'उपचार सुरु झाले पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखीनच खालावली. सुरुवातीलाच हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलत असताना स्तब्ध व्हायचो.या अशा परिस्थिती डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले.' त्यानंतर अतुल बरेही झाले होते मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली. सुरुवातीला जर त्यांना योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित आज अतुल जिवंत असते. आता त्यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT