मराठी सिनेसृष्टीसाठी आज एक अतिशय वाईट दिवस होता. आज सिनेसृष्टीने आपला अतिशय उत्कृष्ट आणि हरहुन्नरी नट गमावला. अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्करोगाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते आपापल्या मनातल्या भावना व्यक्त करताना दिसतायत. सोबतच आपला अनुभव सांगताना दिसतायत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कटू अनुभव घेतल्यानंतर ती शिकवण आपल्या प्रेक्षकांना दिली होती. संजय मोने यांच्या झी मराठीवरील 'कानाला खडा या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमातील त्यांचा अनेक वर्ष जुना हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय ज्यात अतुल म्हणतात, 'मला असं वाटतं की आपण समोरच्यासाठी काय आहोत किंवा समोरचा आपल्याला काय समजतो हे कळणं फार महत्वाचं असतं. त्यात गल्लत झाली ना तर फार गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही एखाद्याला, समोरच्याला भयंकर जवळचा मित्र समजता आणि तो तुम्हाला फक्त टाइमपास समजतो. किंवा इथे तुमची उपलब्धता कामी येते. त्याने फोन केला की तुम्ही समोर त्याच्यासाठी अव्हेलेबल आहात. आणि तुम्ही इंटरेस्टिंग बोलता, तुम्ही छान हसवता.'
अतुल पुढे म्हणाले, 'पण तेव्हा त्याला त्याच्या मनानुसार वेळ घालवायची संधी येते, जेव्हा त्याला चॉइस करायचं असतं की त्याला कुणासोबत वेळ घालवायचा आहे तेव्हा तो तुम्हाला इतर लोकांसोबत भेटताना दिसतो आणि तुम्हाला वेळ नाहीये सांगतो ना तेव्हा असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकलं. समोरच्यासाठी आपण काय आहोत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे.' त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्यांच्या विचारांना दुजोरा देत आहेत सोबतच त्यांना श्रद्धांजली देखील वाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.