अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांच्या औरो मे कहां दम था या चित्रपटाची गेले अनेक महिने बी टाऊनमध्ये चर्चा होती. कारण हा चित्रपट एप्रिल महिन्यापासून पडद्यावर येणार असे बोलले जात होते. अर्थात एप्रिलची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये तो प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल असे जेव्हा सांगण्यात आले आणि अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल आहे. ही एक हळूवार गुंफलेली प्रेमकथा आहे. कृष्णा (अजय देवगण) आणि वसुधा (तब्बू) यांची ही प्रेमकहाणी आहे. कृष्णा आणि वसुधा मुंबईतील एका चाळीत राहात असतात.
त्यांच्यामध्ये लहानपणीच प्रेमाचे धागे हळूहळू गुंफले जातात. आता आपण कधीच एकमेकांची साथ सोडायची नाही असेही ते ठरवितात आणि आपल्या चांगल्या भविष्याचा विचार करतात. कृष्णा एका कंपनीत कामाला लागतो आणि वसुधा अजूनही शिकत असते. कृष्णाची हुशारी आणि त्याचा एकूणच स्वभाव पाहून त्याचा बाॅस त्याला जर्मनीमध्ये जाण्याची आॅफर देतो. त्यामुळे कृष्णा खूप आनंदी होतो आणि ही आनंदाची बातमी वसुधाला देण्यासाठी तो निघतो. तो आणि वसुधा एके ठिकाणी भेटतात. ही बातमी ऐकून वसुधादेखील कमालीची खुश होते. त्याच आनंदामध्ये दोघेही आपल्या घराकडे निघतात.
कृष्णा वसुधाला आपल्या चाळीच्या परिसरात सोडतो. कारण चाळीतील कुणीच आपल्याला पाहू नये असे त्यांना वाटते. पण त्याच वेळी वसुधाच्या नशिबामध्ये काही वेगळेच लिहिलेले असते. तिला एकटीला पाहून काही गुंड तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या झटापटीमध्ये कृष्णाच्या हातून दोन खून होतात. साहजिकच त्याला तुरुंगात जावे लागते. त्याला बावीस वर्षाची तुरुंगवासाची सजा होते. मग तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो वसुधाला भेटतो का...या कालावधीत वसुधा नेमका काय निर्णय घेते...त्यांच्या प्रेमकहाणीचे काय होते...वगैरे वगैरे प्र्शनांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळतील.
दिग्दर्शक नीरज पांडे हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक कल्पक आणि हुशार दिग्दर्शक आहे. स्पेशल २६, एम. एस. धोनी...अनटोल्ड स्टोरी, अय्यारी अशा काही चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे तसेच नाम शबाना, विक्रम वेधा असे काही चित्रपट लिहिलेले आहेत. औरो मे कहां दम था या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच लेखन आणि निर्मितीही त्याने केली आहे. पहिल्यांदाच त्याने रोमँटिक चित्रपट लिहिला आहे आणि दिग्दर्शनही केले आहे. ही कथा दोन कालखंडामध्ये घडणारी आहे आणि या दोन्ही कालखंडातील कथा एकाच जोडप्याची आहे.
शंतनु माहेश्वरी आणि सई मांजरेकर या कलाकारांनी तरुण कृष्णा आणि वसुधा ही भूमिका केली आहे. या भूमिकेत त्यांनी चांगलेच रंग भरलेले आहेत. सई मांजरेकरने वसुधाची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. तिची देहबोली, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, लाजणं तसेच हसणं हे सगळं तिने पडद्यावर उत्तमरीत्या मांडलेले आहे. शंतनुने तिला चांगलीच साथ दिली आहे. अजय देवगण आणि तब्बू हे जाणकार कलाकार आहेत. त्यांनीदेखील आपल्या उत्तम अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. जिमी शेरगिलची एन्ट्री मध्यांतरानंतर होते आणि ती उत्सुकता अधिक वाढवते.
खरं तर एखाद्या प्रे्मपटाला चांगल्या संगीताची आवश्यकता असते. पण त्याबाबतीत चित्रपट काहीसा फिका ठरतो. शिवाय चित्रपटाची गती संथ आहे आणि काही दृश्ये पुनःपुन्हा दाखविल्यामुळे आपले लक्ष विचलित होते. परंतु कलाकारांनी आपल्या तरल आणि संयत अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. मात्र पार्श्वसंगीत कमजोर आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स उत्कंठावर्धक झाला आहे. एक हळूवार प्रेमकथा या चित्रपटात मांडाण्यात आली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.